scorecardresearch

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली, संदीप कर्णिक नवे पोलीस आयुक्त

नाशिक शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची वर्षपूर्ती होण्याआधीच बदली झाली असून त्यांच्या जागी पुणे शहराचे सहआयुक्त संदीप कर्णिक यांची नियुक्ती झाली आहे.

Police Commissioner Ankush Shinde replaced
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची वर्षपूर्ती होण्याआधीच बदली झाली असून त्यांच्या जागी पुणे शहराचे सहआयुक्त संदीप कर्णिक यांची नियुक्ती झाली आहे. शिंदे यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे.

Former MLA Ramesh Kadam
सोलापूर: मोहोळमध्ये रमेश कदम यांचं जंगी स्वागत, राजकीय वादळाची चिन्हे
Ulhas Jagtap
पिंपरी महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी उल्हास जगताप यांची नियुक्ती
OBC agitator ravindra Tonge
ओबीसी आंदोलनकर्ते टोंगे यांची प्रकृती चिंताजनक, तातडीने रुग्णालयात हलविले
Former corporator son suicide nagpur
नागपूर : माजी नगरसेवकाच्या मुलाची आत्महत्या, पोलीस ठाण्याला नागरिकांचा घेराव

गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. नाशिकच्या आयुक्तांचाही समावेश आहे. त्यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे. नाशिकच्या आयुक्तपदाची जबाबदारी पुणे शहराचे सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेबरमध्ये शिंदे यांची नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. महायुतीच्या सरकारमध्ये तिन्ही पक्ष आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी प्रयत्नशील आहेत. एखाद्या पक्षाने विशिष्ट नावासाठी आग्रह धरल्यानंतर अन्य दोन पक्ष वेगळी भूमिका घेतात. मागील काही महिन्यात स्थानिक पातळीवर तसेच राजकारण रंगले. त्याचा परिपाक शिंदे यांच्या बदलीत झाल्याची चर्चा आहे.

आणखी वाचा-नाशिक : पळसेजवळील अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू

गेल्या काही महिन्यात शहरातील कायदा व सुव्यवस्थेला समाजकंटकांकडून आव्हान दिले गेले. सिडको पाठोपाठ विहितगाव व नाशिकरोडमध्ये मद्यधुंद संशयित आणि सराईत गुन्हेगारांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली होती. या तीनही प्रकरणांतील संशयितांना पोलिसांनी अवघ्या काही तासात ताब्यात घेतले. त्यांची वरात काढली गेली. धोंगडे मळ्यात वाहन तोडफोडीच्या प्रकरणातील संशयितांवर मोक्कांतर्गत कारवाईची प्रक्रिया करण्यात आली. अलीकडेच मुंबई पोलिसांनी शिंदे-पळसे गावात अंमली पदार्थ निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. या कारखान्याची शहर पोलिसांना गंधवार्ता नसल्याचे राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोप झाले. नाशिक पोलिसांनी या भागात गोदामावर कारवाई करत अंमली पदार्थांचा मोठा साठा हस्तगत केला. अनेकांची धरपकड केली. या विषयाला राजकीय वळण मिळाले. विरोधकांनी पालकमंत्र्यांवर आरोप केले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Police commissioner ankush shinde replaced sandeep karnik new police commissioner mrj

First published on: 21-11-2023 at 21:22 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×