पोलिसांनी उत्तर महाराष्ट्रात अमली पदार्थांवर मोठी कारवाई केलीय. या कारवाईत तब्बल ४ कोटी २८ लाख रुपयांचा ५ हजारहून अधिक किलो गांजा जप्त करण्यात आला. याशिवाय ७ लाख रुपये किमतीच्या आसपास ब्राउन शुगर, सुमारे २ लाख रुपयांचा चरसही पोलिसांनी जप्त केला. गेल्या वर्षभरात या कारवाया करण्यात आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील वर्षभरात पोलिसांनी उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये छापेमारी करत कारवाया केल्या. यात इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ हस्तगत झाल्यानं खळबळ उडालीय.

“पोलिसांकडून ५ जिल्ह्यांमध्ये मागील दीड महिन्यात विशेष मोहिम”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “नाशिक विभागातील अहमदनगर, धुळे, नंदूरबार, जळगाव आणि नाशिक ग्रामीण या ५ जिल्ह्यांमध्ये मागील दीड महिन्यात विशेष मोहिम राबवण्यात आली. पोलिसांच्या विशेष पथकाचंही यात महत्त्वाचं योगदान आहे. २२ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. यात एकूण ३८ आरोपींचा समावेश आहे. या कारवाईत ४ कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यात चरस, ब्राऊन शुगर, गांजासह चारचाकी, दुचाकी वाहनांचा समावेश आहे.”

“एकूण ३६ पिस्तुल जप्त, ४८ आरोपींना अटक”

“पोलिसांच्या अवैध शस्त्रांस्त्रांवरील कारवाईत एकूण ३६ पिस्तुल जप्त करण्यात आलेत. या प्रकरणांमध्ये ४८ आरोपींना अटक करण्यात आली. या शस्त्रांचा मुख्य पुरवठादार असलेला आरोपी सतनाम सिंग यालाही अटक करण्यात आली. आरोपींकडून काही कार्तूस, मॅगेझीन्ससह दुचाकी आणि चारचाकी वाहनं जप्त करण्यात आली,” अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा : गुजरातमधील ३० हजार कोटींच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी केंद्रानं…, छगन भुजबळ यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये ४ कोटी २८ लाख रुपयांचा ५ हजारहून अधिक किलो गांजा, ७ लाखाच्या आसपास ब्राउन शुगर, सुमारे 2 लाख रुपयांचा चरस जप्त करण्यात आला. मागील वर्षभरात केलेल्या कारवाईत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये छापेमारी करण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ हस्तगत केल्याने उत्तर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police seized drugs of 4 crore 60 lakh from nashik division pbs
First published on: 30-10-2021 at 17:32 IST