नाशिक : शहरातील उपनगर परिसरात झाडांच्या फांद्या काढण्यासाठी आणि विद्युत यंत्रणेच्या देखभाल, दुरुस्तीसाठी रविवारी सकाळी साडेआठ ते दुपारी दीड या वेळेत महावितरणकडून वीज पुरवठा टप्प्याटप्प्याने बंद ठेवण्यात येणार आहे. वीज ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महावितरणच्या नाशिक शहर विभाग दोन अंतर्गत असलेल्या उपनगर कक्षाला वीज पुरवठा करणाऱ्या टाकळी उपकेंद्रातून निघणाऱ्या वाहिनीला झाडांच्या फांद्यांचा स्पर्श होतो. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे धोकादायक आहे. उपनगर विद्युत उपकेंद्र येथून वीज पुरवठा करणाऱ्या उपनगर भागातील वाहिनीनिहाय पुढील भागांचा प्रामुख्याने समावेश होतो.
यात गांधी नगर वाहिनीवरील अभीष नगर, पंचशील नगर, दत्त मंदिर, दीपनगर, विद्युत कॉलनी, सहकार कॉलनी, एनके नगर, एलआयसी सोसायटी, छोटी जनता परिसर, आंबेडकरनगर, जेके टायरजवळ, टागोर नगर, सिध्दार्थनगर तर समता नगर वाहिनीवरील टाकळी रोड, समता नगर, इंद्रायणी सोसायटी, रामदास स्वामीनगर, खोडदे नगर, साळवे मळा, राहुलनगर, सोनवणे बाबा चौक, शांतीपार्क, फुलसुंदर, जामकर मळा, शेलार फार्म या भागांचा समावेश आहे.
इच्छामणी वाहिनीवरील पगारे मळा, अयोध्या नगर, इच्छामणी मंदिर परिसर, सिंधी कॉलनी, खोडदेनगर, व्यापारी बँक परिसर, आम्रपाली, शांती पार्क, श्रमनगर, नंदन व्हॅली, महारुद्र कॉलनी, रघुवीर कॉलनी, जुनी चाळ. डीजीपी नगर वाहिनीवरील टागोर नगर, डीजीपी नगर, रविशंकर मार्ग, वडाळा शिवार. गांधीनगर, गॅरीसन, आर्टिलरी वाहिनीवरील मनोहर गार्डन, जयभवानी रोड, जेतवन नगर. नाशिक रोड वाहिनीवरील नाशिक-पुणे रस्ता, उपनगर पोलीस ठाणे, आयएसपी क्वार्टर, एक्झिक्युटिव्ह अपार्टमेंट या भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे.