scorecardresearch

नाशिकमध्ये प्रथमच इ कचरा संकलन मोहिमेची तयारी

नाशिक फर्स्ट ट्रॅफिक एज्युकेशन संस्थेच्या वतीने १२ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मुंबई नाका येथील संस्थेच्या आवारापासून इ कचरा संकलन मोहिमेस सुरूवात करण्यात येणार आहे.

नाशिकमध्ये प्रथमच इ कचरा संकलन मोहिमेची तयारी
(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

नाशिक फर्स्ट ट्रॅफिक एज्युकेशन संस्थेच्या वतीने १२ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मुंबई नाका येथील संस्थेच्या आवारापासून इ कचरा संकलन मोहिमेस सुरूवात करण्यात येणार आहे.सध्याच्या तंत्रस्नेही जगात तंत्रज्ञानाची कास धरून चुटकीसरशी कार्यालयीन, शैक्षणिक आणि वैयक्तिक कामे केली जात आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल आणि स्मार्ट गॅझेट्सचा वापर आणि खप प्रचंड प्रमाणात वाढला असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक कचरा अखंडपणे निर्माण होत आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने त्याची विल्हेवाट होत नसल्याचे चित्र आहे. अवैज्ञानिक पद्धतींनी इ कचऱ्याची हाताळणी केल्याने हवा, पाणी आणि माती प्रदूषित होत आहे , ज्यामुळे मानवी आणि पर्यावरणीय आरोग्यावर परिणाम होत आहे. यासाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कॉम्प्युटर सायन्स ऑफ इंडिया नाशिक, पूर्णम इकोव्हिजन पुणे आणि पर्यावरण संरक्षण ग्रुप यांच्या सहकार्याने इ-यंत्रण ही इ कचरा संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>‘संजय राऊत यांचे नाशिक दौरे अर्थकारणासाठीच’; टिकेला शिंदे गटाचे प्रत्युत्तर

शहरातील सर्व ओद्योगिक संस्था, शैक्षणिक संस्था, रहिवासी सोसायटी यांनी पुढे येऊन इ-कचरा संकलन केंद्र म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आपल्या कार्यालयातील, संस्थेतील आणि घरातील इ कचरा, २४, २५ आणि २६ जानेवारी या दिवशी आपल्या जवळच्या इ कचरा संकलन केंद्रावर नेवून देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 10:13 IST

संबंधित बातम्या