नाशिक : मनोज जरांगे यांचा सात ऑगस्टपासून राज्यातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर आदी भागात होणाऱ्या दौऱ्याचा समारोप १३ तारखेला नाशिकमध्ये शांतता फेरीने होणार आहे. या फेरीत लाखो मराठा समुदायाला सहभागी करण्याची तयारी सकल मराठा समाजाने केली आहे. या माध्यमातून ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या जिल्ह्यात एकप्रकारे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

शहर सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जरांगे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, नांदूरनाका येथील साईलीला लॉन्समध्ये नुकतीच आढावा बैठक पार पडली. यावेळी विविध ठराव मंजूर करण्यात आले. जरांगे यांच्या राज्यस्तरीय दौऱ्याच्या समारोपानिमित्त शहरात निघणाऱ्या शांतता फेरीत मराठा समाजाला कुटुंबासह सहभागी करण्याचे नियोजन एका ठरावात करण्यात आले आहे. १३ ऑगस्ट रोजी होणारी जरांगे यांची शांतता फेरी तपोवन येथून सुरू होईल. पंचवटी, मालेगाव स्टँड, रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल, मेहेर चौकमार्गे शिवतीर्थ असा फेरीचा मार्ग आहे. या ठिकाणी जरांगे हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील. तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करून शांतता फेरीचे काटेकोरपणे नियोजन केले जाणार आहे. समाजाच्या नावाने समाजमाध्यमात कुठलीही दुफळी निर्माण होईल असे संदेश टाकू नये, असा ठराव बैठकीत करण्यात आला.

one and a half months Recce is done for killing Vanraj Andekar
खुनाची दीड महिन्यांपासून रेकी, वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी तीन पिस्तुलांचा वापर
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Donald Trump and Kamala Harris clash over tax hike
करवाढीवरून ट्रम्प-हॅरिस यांच्यात मतभेद
dengue malaria
कल्याण-डोंबिवलीत दोन महिन्यांत डेंग्यू, मलेरियाचे ३८७ रूग्ण; संशयित २० हजार नागरिकांच्या रक्ताची तपासणी
Hit and run in Gondia thrilling incident caught on CCTV
Video : गोंदियात ‘हिट अँड रन’, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
houses sold mumbai, houses sold August mumbai,
मुंबई : ऑगस्टमध्ये ११ हजारांहून अधिक घरांची विक्री, मुद्रांक शुल्क दरात कपात होण्याच्या निर्णयाकडे लक्ष
housing prices, Pune, Hinjewadi, real estate, housing prices rising in pune, property market, metro cities, price increase
हिंजवडीत घरांच्या किंमती गगनाला भिडल्या! राज्यात डोंबिवली, पनवेलमध्ये सर्वाधिक वाढ
rahul gandhi to visit sangli
Rahul Gandhi Sangli Visit : राहुल गांधी ५ रोजी सांगली दौऱ्यावर; पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण

हे ही वाचा… Nashik Rain : नाशिकमध्ये तुफान पाऊस, गोदावरी नदीला पूर आल्याने दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी; यलो अलर्ट जाहीर

हे ही वाचा… मालेगावजवळ गिरणा नदीत १५ जण अडकले- बचावकार्य सुरु

बैठकीत, सकल मराठा क्रांती मोर्चा नाशिक जिल्ह्याच्यावतीने शरद पवार यांना घरी जाऊन १९९४ मधील शासकीय अध्यादेशाबाबत जाब विचारण्याचे निश्चित झाले. तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करून शांतता फेरीचे नियोजन, फेरीसाठी जिल्ह्याच्यावतीने एक समिती असावी आदी ठराव करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर, ॲड. शिवाजी सहाणे, विलास पांगारकर, नानासाहेब बच्छाव, बंटी भागवत आदींनी ठराव मांडले. जिल्हा सकल मराठा समाज सर्व तालुका व शहर एकत्रित बैठक सोमवारी दुपारी एक वाजता साईलीला लॉन्स याच ठिकाणी घेऊन १३ तारखेच्या नियोजनासंदर्भात समित्यांची स्थापना केली जाणार आहे.