scorecardresearch

धुळे जिल्ह्यातून पाच गुन्हेगार हद्दपार; सात जणांविरुद्धही प्रस्ताव

१२ जणांच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार आहे. २०९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Five criminals have been deported from dhule and and proposal against seven suspects
धुळे जिल्ह्यातून पाच गुन्हेगार हद्दपार; सात जणांविरुध्दही प्रस्ताव

धुळे: जिल्ह्यातील पाच गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असून सात संशयितांविरुध्दही हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

सण आणि उत्सवाच्या काळात विघ्न येऊ नये,यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सतर्क आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव, ईदच्या काळात नागरिकांनी सामाजिक सलोखा राखावा, एकोप्याने येणारे सर्व सण आणि उत्सव साजरे करून जिल्ह्याची शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल आणि पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले आहे.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान

हेही वाचा… विश्वकर्मा योजनेसाठी प्रभावी अमलबजावणी आवश्यक, डॉ. भारती पवार यांचे प्रतिपादन

आगामी सण आणि उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची शांतता समितीची बैठकही झाली. यावर्षी अनंत चतुर्दशी आणि ईद एकाच दिवशी असल्याने त्यांच्या मिरवणुकीचे नियोजन प्रशासनाने केले आहे. एक दिवसाआड या मिरवणुका निघतील. या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची देखील दक्षता बाळगली जाणार आहे. समाजाला बाधा ठरतील अशा समाजकंटकांविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई आणि हद्दपारीचे आदेश अधीक्षक बारकुंड यांनी दिले आहेत. १२ जणांच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार आहे. २०९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2023 at 12:24 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×