नाशिक – अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा ताण वाढत असल्याने याविरोधात महाबँक कर्मचाऱ्यांनी सोमवारी शहरातील गडकरी चौकातील गृहनिर्माण भवनासमोर निदर्शने करण्यात आली. ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने नोकर भरतीच्या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. संघटनेने काम बंद आंदोलनाचा इशारा देऊनही वरिष्ठांनी त्याकडे लक्ष दिले नाही. याबाबत मुंबई येथील कामगार उपायुक्त यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने सोमवारी काम बंद आंदोलन करण्यात आले. बँकेत सफाई कर्मचारी तसेच शिपाई

यांची पदे रिक्त आहेत. अनेक वर्षांपासून या पदावर तात्पुरते कर्मचारी काम करत आहेत. त्यांना सेवेत सामावून घेत कायम करा, बँकेने त्वरीत लिपीकाची रिक्त पदे भरावी, सर्व शाखा तसेच एटीएम येथे सुरक्षारक्षक नेमण्यात यावे, अशी मागण्या करण्यात आल्या.