scorecardresearch

नाशिक : पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोरील नियोजित आंदोलनाविषयी कार्यकर्त्यांकडून जनजागृती

कृती समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना यांनी आंदोलन जाहीर केले असले तरी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते गावोगावी या आंदोलनाविषयी जनजागृती करीत आहेत.

नाशिक : पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोरील नियोजित आंदोलनाविषयी कार्यकर्त्यांकडून जनजागृती
नाशिकचे पालकमंत्री दादा भूसे यांच्या निवासस्थानासमोरील नियोजित आंदोलनाविषयी कार्यकर्त्यांकडून जनजागृती

पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानासमोर १६ जानेवारीला नाशिक जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने शेतकरी राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत बिऱ्हाड आंदोलन करणार आहेत. सर्वपक्षीय कार्यकर्ते गावोगावी या आंदोलनाविषयी जनजागृती करीत आहेत.

हेही वाचा- नाशिक : भातोडे शाळेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची एनसीईआरटीकडून पडताळणी

बिऱ्हाड आंदोलनासंदर्भात पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांची कृती समितीचे मार्गदर्शक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, सदस्य गंगाधर निखाडे, प्रशांत कड, संतोष रेहरे, बाबा कावळे, बापूसाहेब महाले यांनी भेट घेऊन माहिती दिली. नाशिक जिल्हा बँकेने ६२ हजार शेतकऱ्यांची जमीन लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. घेतलेल्या मुद्दलापेक्षा अनेक पटीने व्याज लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या किंमतीपेक्षा कर्ज अधिक झाले आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकरी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहेत. नाशिक जिल्ह्यात याविरुद्ध मोठा आक्रोश आहे. सरकारने याप्रकरणी हस्तक्षेप करावा आणि सहा हजार शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवाव्यात, अशी कृती समितीची प्रमुख मागणी आहे. आंदोलनात शेतकरी संघटनेचे नेते अनिल धनवट, ललित बहाळे, सीमाताई नरोडे हेदेखील सहभागी होणार आहेत. कृती समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना यांनी आंदोलन जाहीर केले असले तरी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते गावोगावी या आंदोलनाविषयी जनजागृती करीत आहेत.

हेही वाचा- “अरे तू काय इथे कोर्ट मार्शल करायला बसलाय का?” भर पत्रकार परिषदेत संजय राऊत पत्रकारावर भडकले

पालकमंत्र्यांनी न्याय द्यावा

नाशिक जिल्ह्यातील ६२ हजार शेतकरी भूमिहीन होत असताना या शेतकऱ्यांना न्याय मागायचा असेल तर जिल्ह्यातील पालकत्वाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते पालकमंत्री दादा भुसे हेच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतात. त्यामुळे हे आंदोलन आम्ही त्यांच्या घरासमोर करणार आहोत. या संपूर्ण शेतकऱ्यांच्या पालकत्वाची जबाबदारी त्यांची आहे. आणि ते ती पार पाडतील. अशी अपेक्षा आम्हाला आहे. तसे न झाल्यास आंदोलन तीव्र होणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-01-2023 at 17:57 IST

संबंधित बातम्या