scorecardresearch

प्रा. सोमनाथ वानखेडे यांना विद्यापीठाचा पुरस्कार

 विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात कुलगुरू डॉ. नितीन  करमळकर यांच्या हस्ते आणि प्र.कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, अभिनेते श्रीरंग गोडबोले आदींच्या उपस्थितीत प्रा. वानखेडे यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रतिनिधीक छायाचित्र

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इ-कंटेंट निर्मितीच्या उपक्रमाअंतर्गत ‘इ-कंटेंट डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड लर्निग इनोव्हेशन सेंटर’कडून दिला जाणारा विज्ञान तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ठ इ-कंटेंट निर्मिती पुरस्कार मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयातील प्रा. सोमनाथ वानखेडे यांना देण्यात आला आहे.

 विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात कुलगुरू डॉ. नितीन  करमळकर यांच्या हस्ते आणि प्र.कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, अभिनेते श्रीरंग गोडबोले आदींच्या उपस्थितीत प्रा. वानखेडे यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रा. वानखेडे २०१६ पासून इलेक्ट्रॉनिक सायन्ससंदर्भातील चित्रफिती सोप्या भाषेत बनवून समाज माध्यमातून विद्यार्थ्यांना देत आले आहेत. कोरोना काळात त्यांनी तयार केलेल्या सूक्ष्म निरीक्षकावरील चित्रफितींच्या जोडणी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होत्या. ज्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा घेता आला. पुरस्कारामुळे यापुढे देखील तंत्रज्ञानविषयक नवनवीन चित्रफिती सोप्या शब्दांत बनवून हा उपक्रम चालू ठेवण्यास बळ मिळाल्याचे मनोगत प्रा. वानखेडे यांनी व्यक्त केले.

(पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयातील प्रा. सोमनाथ वानखेडे यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, श्रीरंग गोडबोले आदी)

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pvt university award somnath wankhede field technology maratha vidya prasarak samaj sanstha amy

ताज्या बातम्या