नाशिक: अवैध देशी दारु अड्ड्यावर छापा, ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

देवठाण शिवारात केलेल्या कारवाईत ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

raid on illegal country liquor
घरामागील पडवीत एकूण एक हजार २४८ बाटल्या दारुचा साठा मिळून आला. (फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

नाशिक: वणी पोलिसांनी अवैध देशी दारु विक्री विरोधात धडक मोहीम सुरु केली असून देवठाण शिवारात केलेल्या कारवाईत ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वणी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक नीलेश बोडखे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी पहाटे अडीच वाजता देवठाण शिवारात छापा टाकण्यात आला.

देवठाण येथील भगवान गुंबाडे यांच्या घरामागील पडवीत एकूण एक हजार २४८ बाटल्या दारुचा साठा मिळून आला. पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त केला असून गुंबाडेविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे . वणी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अवैध व्यवसाय सुरु असतील तर त्याची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Nashik News (नाशिक / उत्तर महाराष्ट्र न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 20:44 IST
Next Story
संयोगीताराजे व्हायरल पोस्ट : “सनातन धर्म पुन्हा डोकं वर काढतोय..” जितेंद्र आव्हाडांनी दिली ‘या’ आंदोलनाची हाक
Exit mobile version