scorecardresearch

Premium

नाशिक: आरोग्य विद्यापीठातर्फे उद्या फेरी, टपाल तिकीट प्रकाशन

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त नऊ आणि १० जून रोजी विद्यापीठाच्या शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Maharashtra University of Health Sciences
शुक्रवारी सकाळी सात वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून फेरी काढण्यात येणार आहे. (फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त नऊ आणि १० जून रोजी विद्यापीठाच्या शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!

शुक्रवारी सकाळी सात वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून फेरी काढण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे उपस्थित राहणार आहेत. विशेष पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी गंगाथरन डी,, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल उपस्थित राहणार आहेत. शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत विद्यार्थी कल्याण विभागातर्फे आयोजित बक्षीस वितरण सोहळ्यास माजी सनदी अधिकारी डॉ. किरण बेदी, कुलगुरू माधुरी कानिटकर उपस्थित राहणार आहेत. दुपारी तीन वाजता स्पंदन हा विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. सायंकाळी पाच वाजता टपाल तिकीट प्रकाशन आणि सुवर्णपदक वितरण सोहळा पार पडणार आहे. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार अध्यक्षस्थानी असतील. पालकमंत्री दादा भुसे, डॉ. किरण बेदी, पुणे टपाल विभागाचे मुख्य रामचंद्र जायभावे उपस्थित राहतील.

आणखी वाचा-समाज माध्यमातून सामाजिक तेढ वाढविल्यास कारवाई, पोलिसांचा इशारा

१० जून रोजी सकाळी ११ वाजता विविध पुरस्कार, बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिकुलपती गिरीश महाजन, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे डॉ. अरूणा वनीकर, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव डॉ. अश्वनी जोशी उपस्थित राहणार आहेत. यावेळी माजी कुलगुरूंचा सत्कार होणार असून उत्कृष्ट महाविद्यालयांना गौरविण्यात येणार आहे. २४ वर्षे सेवापूर्ती केलेल्या अधिकाऱ्यांचाही सत्कार होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rally tomorrow by arogya university postage stamp release mrj

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×