सटाणा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोधेश्वर येथील खलाशी बाळू गायकवाड या आदिवासी तरुणाकडून दुर्मीळ जातीचे कासव हस्तगत केले.

वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गायकवाड याच्यावर सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धेतून तंत्र-मंत्रासाठी या कासवाचा वापर केला जाणार असल्याची साशंकता आहे.

वन कर्मचारी गवळी व मोहिते यांना मंगळवारी डागसौंदाणे परिसरात गायकवाड संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आला.

चौकशी केली असता त्याच्याकडे कासव आढळले.

हे कासव तंत्र-मंत्रासाठी विकण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचा अंदाज वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. अंधश्रध्देतून घुबड, गांडुळ व कासव अशा प्राण्यांची तस्करी होते.

पैशांच्या मोहासाठी अनेक उच्चभ्रू लोकांकडून अशा कासवांची खरेदी केली जाते. यामुळे कासव तस्करीचे प्रमाण वाढले आहे.