आमदार हिरामण खोसकर यांचा आरोप

नाशिक : ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या उत्खननाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करून आमदार हिरामण खोसकर यांनी या उत्खननास महसूल आणि वन विभागच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.  गेली दोन वर्षे हे काम सुरू असताना महसूल आणि वन विभागाकडून कार्यवाही का करण्यात आली नाही, असा प्रश्न खोसकर यांनी उपस्थित के ला.

ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी होत असलेल्या उत्खननामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याने याविषयी काही दिवसांपासून पर्यावरणप्रेमी संघटना आक्र मक झाल्या आहेत. वेळोवेळी त्यांच्याकडून हा विषय मांडण्यात येत असल्याने या विषयावर आता परिसरात तसेच लोकप्रतिनिधींमध्येही जागृती होऊ लागली आहे. ब्रह्मगिरीच्या सौंदर्यास परिसरातील वनसंपदेमुळे अर्थ आहे. ही वनसंपदा नष्ट झाल्यास आणि ब्रह्मगिरी पोखरण्याचे काम बंद न झाल्यास परिसरातील वाडय़ा-पाडय़ांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होणार आहे. कायमच्या होणाऱ्या या नुकसानीतून सावरणे गरीब आदिवासी बांधवांसाठी कठीण होणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार खोसकर आणि अन्य पर्यावरणप्रेमी संघटनांनी ब्रह्मगिरी उत्खननाची पाहणी के ली.

यावेळी खोसकर यांनी महसूल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या हलगर्जीपणाविषयी नाराजी व्यक्त केली. एखाद्या शेतकऱ्याच्या जमिनीचे सपाटीकरण सुरू असले की अगदी सकाळी हे अधिकारी त्या ठिकाणी चौकशीसाठी धडकतात. गरिबांच्या या घरकुलासाठी रेती अथवा इतर साहित्य घेऊन येणारा ट्रॅक्टर यांना रात्रीही कसा सापडतो, तेव्हा ही यंत्रणा इतकी जागरूक कशी होते, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित के ले. इतक्या जवळ इतके जिलेटीनचे स्फोट घडवून आणले जात असताना आणि इतकी मोठी यंत्रसामग्री परिसरात असताना यंत्रणेला ते कसे दिसले नाही, अशी विचारणाही त्यांनी के ली. गेली दोन वर्षे हे काम सुरू असताना महसूल आणि वन विभाग गप्प कसे राहिले, याबद्दल खोसकर यांनी आश्चर्य व्यक्त के ले. यावेळी खोसकर यांच्याकडे सुपलीच्या मेट येथील ग्रामस्थांनी आपले गाऱ्हाणे मांडले. आज जीव मुठीत धरून जगण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे. यापूर्वी आम्ही तहसील कार्यालयात ग्रामपंचायतीच्या वतीने पत्र दिले होते. त्यानंतर काही कार्यवाही होते किं वा नाही, यासाठी आम्ही तीन वेळा चौकशी केली .परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. तहसील कार्यालयातून लेखी आणि तोंडी कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नाही, अशी तक्रार ग्रामस्थांनी के ली. यावेळी आमदारांसोबत तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार आणि मंडल अधिकारी उपस्थित होते. ब्रह्मगिरी पायथ्याशी उत्खननामुळे होत असलेल्या नुकसानीची पाहणी करून आमदार हिराणण खोसकर हे पर्यावरणप्रेमींशी चर्चा करताना