नंदुरबार: गारपीट आणि अवकाळीने कंबर मोडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने अद्याप मदत जाहीर न केल्याने संतप्त झालेले राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी राज्यकर्ते हे नालायक, हलकट आणि स्वार्थी असल्याची विखारी टीका केली. जिल्हा दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटण्यासाठी नंदुरबार येथे आलेल्या गोटे यांना पत्रकारांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीवरुन विचारल्यावर ते राज्यकर्त्यांवर चांगलेच घसरले. राज्यकर्ते हे केवळ बोलतात. मात्र त्यांना शेतकऱ्यांची अजिबात जाण नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यकर्त्यांचा फक्त माल लगाव आणि माल कमाव हा धंदा आहे. शेतकऱ्यांना एक दमडीची मदत न देणारे हे हलकट राज्यकर्ते पुन्हा सत्तेत येतील असे वाटत नाही, असेही गोटे यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रतिसाद आणि त्यांच्या विदेशातील भाषणामुळे सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणल्याने सूडामुळेच त्यांच्यावर कारवाई सुरु असल्याचा आरोपही गोटे यांनी केला
Already have an account? Sign in