नाशिक : संविधानाच्या सन्मानार्थ १५ वे विद्रोही साहित्य संमेलन नाशिक येथे येत्या  ४ आणि ५ डिसेंबर रोजी केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवीन तारखा जाहीर झाल्या असून याच तारखांना या संमेलनाला समांतर असे १५ वे विद्रोही साहित्य संमेलन होणार आहे.

करोना संसर्गामुळे अखिल भारतीय संमेलनाप्रमाणे विद्रोही साहित्य संमेलन स्थगित करण्यात आले होते. मात्र आता संमेलन होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष शशी उन्हवणे यांनी दिली. महात्मा फुले यांनी मराठी ग्रंथकार सभेला पाठवलेल्या पत्रातील भूमिकेवर आधारित व दिल्ली शेतकरी आंदोलन समर्थनार्थ हे संमेलन होणार आहे.

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
marathi sahitya sammelan, Delhi,
यंदा साहित्य संमेलनाचा मांडव थेट दिल्लीत? महामंडळाच्या बैठकीत जे ठरले….
elgar parishad shobha sen
एल्गार परिषद: शोमा सेन यांना सहा वर्षांनंतर जामीन, हे प्रकरण आहे काय आणि त्यातील अन्य १६ आरोपींची सद्यस्थिती काय?
pune set exam marathi news, set exam registration marathi news
‘सेट’ परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीत वाढ; पारंपरिक पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा

संमेलनाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीस गणेश उन्हवणे, किशोर ढमाले, राजू देसले आदी उपस्थित होते. बैठकीत संमेलनाच्या अनुषंगाने समित्यांनी काय कामे करावीत याचा आढावा घेण्यात आला. संमेलनाच्या उभारणीसाठी निधी हा जनतेच्या सहकार्याने संकलित करण्यात येणार आहे. यासाठी ‘एक मूठ धान्य’ हा उपक्रम राबविला जाणार आहे.

निधी संकलनात ‘सम्यक दान’ संकल्पना मांडण्यात आली आहे. सर्वांच्या सहकार्याने निधी संकलन मोहीम राबवण्यात येत आहे. या संदर्भातील बँक खाते नाशिक मर्चंट बँकेत उघडण्यात आले असून नाशिककरांनी संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.