स्वच्छता ही सेवा अभियानातंर्गत जिल्ह्यात स्वच्छता धावव्दारे जनजागृती करण्यात आल्यानंतर सोमवारी स्वच्छता कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांचा सन्मान करण्यात आला. जिल्ह्यात १५ सप्टेंबरपासून स्वच्छता ही सेवा अभियानातंर्गत श्रमदान, गृहभेट, विविध स्पर्धा, स्वच्छता धाव, पर्यटन व धार्मिक स्थळांची स्वच्छता असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात रविवारी विविध ठिकाणी स्वच्छता धाव काढण्यात आली. त्यानंतर सोमवारी जिल्ह्यात ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणा-या कर्मचा-यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच ग्रामपंचायतींमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. स्वच्छता ही सेवा अंतर्गत दोन ऑक्टोंबरपर्यत राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanitation workers honoured in village panchayats zws
Show comments