नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकासआघाडीकडून काँग्रेसला देण्यात आली. यानंतर काँग्रेसने उमेदवार म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, सुधीर तांबेंनी मुलगा सत्यजीत तांबेंसाठी माघार घेतली आणि मुलाचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. यानंतर सत्यजीत तांबेंनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज का भरला याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते गुरुवारी (१२ जानेवारी) नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

सत्यजीत तांबे म्हणाले, “आम्ही काँग्रेस पक्षाकडे मागणी केली होती की, यावेळी मला उमेदवारी द्यावी. काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींमध्ये अनेक लोकांची मी पक्षाच्या वतीने उमेदवारी करावी अशी इच्छा होती. काँग्रेस पक्षाने मात्र निर्णय घेताना डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीचा निर्णय घेतला. आज दुपारी त्यांनी हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे तांत्रिक अडचणी आल्याने मला शेवटच्या क्षणाला अपक्ष म्हणून अर्ज भरावा लागला.”

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
महायुतीचं सरकार टिकणार नाही? अजित पवार गटातील आमदाराच्या वक्तव्याने खळबळ; भाजपा नेत्याला म्हणाले, “मी सुरूंग लावून…”
vijay vadettiwar hansraj ahir kishor jorgewar rajendra vaidya sandeep girhe away from election campaign
नेत्यांचे रूसवे फुगवे! वडेट्टीवार, अहीर, जोरगेवार, वैद्य, गिऱ्हे प्रचारापासून दूर
Vishwajeet Kadam vishal patil kc venugopal
सांगली लोकसभेसाठी विश्वजीत कदमांनी ठोकला शड्डू; पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर म्हणाले, “शेवटचा पर्याय म्हणून आम्ही…”
MP Udayanaraje Bhosle will come to Satara as a BJP candidate in the Grand Alliance
महायुतीतील भाजपाचे उमेदवार म्हणून खासदार उदयनराजे साताऱ्यात येणार

हेही वाचा : “…म्हणून मी माझ्या नावाचा एबी फॉर्म असतानाही सत्यजीत तांबेंचा अर्ज भरला”, सुधीर तांबेंनी सांगितलं कारण

“मी दोन अर्ज भरले आहेत”

“असं असलं तरी मी अर्ज भरताना दोन अर्ज भरले आहेत. एक अर्ज काँग्रेसचा आहे आणि एक अपक्ष म्हणून अर्ज आहे. परंतु माझ्या नावाचा एबी फॉर्म वेळेवर येऊ न शकल्याने आता मला अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावी लागेल. परंतु मी काँग्रेसचाच उमेदवार आहे. मी आजपर्यंत काँग्रेसच्या विचारावर काम केलं आहे,” असं मत सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केलं.

“मी भाजपाच्या सर्व नेत्यांना भेटणार आहे”

“असं असलं तरी मी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना भेटणार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना भेटणार आहे. मी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या सर्व नेत्यांना भेटणार आहे. मी भाजपाच्याही सर्व नेत्यांना भेटणार आहे. मी सर्वांना भेटून विनंती करणार आहे की, राजकीय पक्षांच्या पलिकडे जाऊन सर्वांनी या निवडणुकीत माझ्या पाठिशी उभं रहावं,” असंही सत्यजीत तांबेंनी नमूद केलं.

हेही वाचा : फडणवीस यांच्या ‘त्या’ वक्तव्यातच सत्यजित तांबे यांच्या बंडाची बिजे

“वरिष्ठ नेत्यांशी अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती”

सत्यजीत तांबे म्हणाले, “काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आणि आमची यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. किंबहुना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचीच इच्छा होती की, मी निवडणूक लढवावी. परंतू तांत्रिक कारणामुळे डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, माझी उमेदवारी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आहे.”

“मी भाजपाच्या नेत्यांना जाऊन भेटणार आहे”

“सर्व पक्षाच्या लोकांनी मला मदत करावी. मी भाजपाच्या नेत्यांना जाऊन भेटणार आहे. तसेच त्यांनी मला मदत करावी अशी विनंती करणार आहे,” असंही सत्यजीत तांबे यांनी नमूद केलं.

हेही वाचा : उमेदवारी अर्जाच्या गोंधळाची राज्यात जुनीच परंपरा

“…म्हणून बाळासाहेब थोरात उमेदवारी अर्ज भरताना सोबत नव्हते”

विशेष म्हणजे सत्यजीत तांबे उमेदवारी अर्ज भरताना बाळासाहेब थोरात उपस्थित नव्हते. याबाबत विचारलं असता सत्यजीत तांबे म्हणाले, “बाळासाहेब थोरात यांची तब्येत ठीक नाही. म्हणून ते आज उमेदवारी अर्ज भरताना सोबत नव्हते. ते आणि धनंजय मुंडे एकाच रुग्णालयात आहेत. त्यामुळे ते धनंजय मुंडेंच्या भेटीसाठी गेले आहेत. ते दोघेही ब्रिचकँडी रुग्णालयात आहेत.”