scorecardresearch

MLC Election Result: पाचव्या फेरीअखेर सत्यजित तांबे विजयी, मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव

Nashik Graduate Constituency Election Result: सत्यजित तांबे यांनी विजय संपादन केला आहे.

shubhangi-patil-satyajit-tambe
सत्यजीत तांबे-शुभांगी पाटील (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Nashik Graduate Constituency Election Result: नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी पहिल्या फेरीतच आघाडी घेतली होती. पण पाचव्या फेरीअखेर सत्यजित तांबे यांनी विजय संपादन केला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव झाला आहे.

सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीने महिला नेत्या शुभांगी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत ही निवडणूक चुरशीची बनली होती. ३० जानेवारी रोजी पार पडलेल्या या निवडणुकीचा अखेर निकाल हाती आला आहे. या निवडणुकीत ६८ हजार ९९९ मतं मिळवत सत्यजित तांबे यांनी विजय संपादन केला आहे.

सत्यजित तांबे यांच्या भविष्यातील भूमिकेविषयी उत्सुकता

सत्यजित तांबे यांना पाचव्या फेरीअखेर ६८ हजार ९९९ मते मिळाली. तर शुभांगी पाटील यांना ३९ हजार ५३४ मतांवर समाधान मानावं लागलं. चुरशीच्या या लढतीत सत्यजित तांबे यांनी सुमारे २९ हजार ४६५ मताधिक्यांनी विजय मिळवला आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 23:22 IST