नाशिक : मस्कत येथे होणाऱ्या डब्लूटीटी युथ कंटेंडर १५ आणि १७ वर्षे वयोगटाखालील आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी नाशिकच्या सायली वाणी आणि तनिशा कोटेचा यांची भारतीय संघात निवड झाली आहे. या स्पर्धा १४ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत.

तीन ते चार वर्षांपासून नाशिकच्या टेबल टेनिसपटूंची राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर कामगिरी उल्लेखनीय होत आहे. नाशिकच्या दोन मुलींनी  एकाच वेळी भारताचे प्रतिनिधित्व करणे ही गोष्ट नाशिकसाठी अभिमानास्पद आहे.  या स्पर्धेत अनेक देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. धावणे, बुद्धिबळ, नेमबाजी यासह आता टेबल टेनिसमध्येही नाशिकच्या खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय  होत आहे.