लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : नाशिकरोड येथील सिन्नर फाटा परिसरात युवकाच्या हत्या प्रकरणातील दुसऱ्या संशयितास नाशिकरोड पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.

शुक्रवारी सायंकाळी सिन्नर फाटा परिसरात जमिनीच्या वादातून प्रमोद वाघ याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सद्दाम मलिक आणि योगेश पगारे याच्या विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील प्रमुख संशयित सद्दाम मलिक याला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते. मात्र घटना घडल्यापासून योगेश पगारे फरार होता. उपनगर परिसरातील ईच्छामणी मंदिरामागे दडून बसलेल्या पगारे याला नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले.