scorecardresearch

Premium

कांदा निर्यातबंदी विरोधात शरद पवार रस्त्यावर

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातर्फे सोमवारी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवड येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे

sharad pawar to participate in protest against onion export ban on mumbai agra national highway
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (संग्रहित छायाचित्र)

नाशिक : केंद्र सरकारने अकस्मात लागू केलेल्या कांदा निर्यात बंदीचे स्थानिक पातळीवर तीव्र पडसाद उमटत असताना या विरोधात माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे रस्त्यावर उतरणार आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातर्फे सोमवारी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवड येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे. या आंदोलनात पवार हे सहभागी होत असून अशाप्रकारे आंदोलनात उतरण्याची त्यांची पहिलीच वेळ असल्याचा दावा पदाधिकारी करत आहेत.

निर्यात बंदीच्या मुद्यावरून स्थानिक पातळीवर उमटलेले तीव्र पडसाद व विरोधकांनी सुरू केलेली आंदोलने या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार या निर्णयाचा फेरविचार करेल असे संकेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले आहेत.

Vasai Bhayander Roro Boat Hits Jetty Passengers Stranded As Boat Gets Stranded
वसई भाईंदर रोरो बोट जेट्टीला धडकली, बोट अडकून पडल्याने प्रवाशांचा खोळंबा
bhandara marathi news, more than 200 workers marathi news
भंडारा : दोनशेच्यावर संतप्त कामगारांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला, काय आहे कारण जाणून घ्या…
A chemical tanker overturned on the national highway Dahanu
राष्ट्रीय महामार्गावर रसायन वाहून नेणारा टँकर उलटून अपघात, प्रथम दर्शनी अमोनिया असल्याचा अंदाज; परिसरात भीतीचे वातावरण
A statue of Ahilya Devi Holkar was erected illegally on the national highway near Natepute solhapur
नातेपुतेजवळ राष्ट्रीय महामार्गावर एका रात्रीत प्रकटला अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा; आठजणांविरूध्द गुन्हा दाखल

निर्यात बंदीच्या निर्णयानंतर व्यापारी संघटनेने लिलाव बेमुदत बंद केले आहेत. अकस्मात लागू झालेल्या निर्णयाने कांदा दरात मोठी घसरण झाली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी बाजार समितीत आणलेला माल विक्री न करता परत नेला. आधी ४० टक्के निर्यात शुल्क नंतर ८०० डॉलर किमान निर्यात मूल्य वाढवल्यामुळे मागील चार महिन्यात कांदा उत्पादकांचे कोटय़वधींचे नुकसान झाले. आता संपूर्ण निर्यात बंदीमुळे आणखी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची व्यथा आम्ही मांडल्यानंतर शरद पवार यांनी आंदोलनात स्वत: सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी सांगितले. रास्ता रोकोसाठी राष्ट्रवादीने शुक्रवारी जिथे शेतकऱ्यांवर सौम्य लाठीमार झाला होता, त्याच ठिकाणाची निवड केली आहे.

हेही वाचा >>> धावत्या वाहनातील प्राणवायू सिलिंडरच्या स्फोटाने नाशिकच्या काही भागात हादरा; इमारती, वाहनांच्या काचा फुटल्या

उत्पादक सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार

केंद्र सरकारच्या कांदा आयात-निर्यात धोरणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित दाद मागण्याचा निर्णय कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. तसा ठराव सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे झालेल्या कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या बैठकीत करण्यात आला. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक दिल्लीत जाऊन पंतप्रधान, गृहमंत्री व केंद्रीय वाणिज्यमंत्री यांची भेट घेऊन कांदा निर्यात बंदी तत्काळ हटवण्याची मागणी करणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील कोणत्याही बाजार समितीत प्रतिक्विंटल तीन हजार रुपये पेक्षा कमी दराने लिलावात बोली लागल्यास उत्पादक हे कांद्याचा झालेला लिलाव रद्द करतील आणि कोणीही शेतकरी व्यापाऱ्यांना तीन हजार पेक्षा कमी दरात कांदा देणार नाही असे तीन महत्त्वाचे ठराव बैठकीत करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar to participate in protest against onion export ban on mumbai agra national highway zws

First published on: 10-12-2023 at 01:39 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×