नंदुरबार– भारतीय जनता पक्षाला जिवंत करण्याचे काम एकनाथ शिंदेंनी केले, असा दावा शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात भाजपचे अस्तित्व राहिले नव्हते. एकनाथ शिंदेंनी उठाव केला. आणि भाजप सत्तेत आले. त्यातच डॉ. विजयकुमार गावितांना मंत्री पदाची लॉटरी लागल्याचे आमदार रघुवंशी यांनी सांगितले.

नंदुरबारमधील विविध प्रश्नावर सोमवारी आमदार ऱघुवंशी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आपले कट्टर विरोधक असणारे भाजप आमदार डॉ विजयकुमार गावितांनाही त्यांनी लक्ष्य. केले. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात भाजपचे अस्तित्वच शिल्र्लक राहिले नव्हते. एकनाथ शिंदॆंनी उठाव केला नसता तर भाजप सत्तेत आले नसते. आणि डॉ विजयकुमार गावितांना मंत्रीपद मिळाले नसते. त्यामुळे भाजपला जिंवत करण्याचे कामच एकनाथ शिंदेनी केले. आम्ही एकत आहोत देवेंद्रजी केंद्रात जात आहेत. महाराष्ट्राचे केंद्रात नेतृत्व असलेच पाहिजे. जर देवेंद्रजी केंद्रात गेले तर महाराष्ट्राची धुरा कोणाकडे द्यावी, असे असेल तर एकनाथ शिंदे यांचे नाव अग्रेसर आहे. अडीच वर्षात त्यांनी केलेले काम पाहता त्यांचेच नाव अग्रेसर असल्याचे रघुवंशी यांनी नमूद केले.

प्रशासकीय राजवट असल्याने तीन वर्षात पंधराव्या वित्त आयोगाचे पैसेच आले नसल्याचे सांगत आता काही प्रमाणात हप्ता आला असला तरी त्यातील ५० टक्के निधी हा घनकचरा व्यवस्थापनावर खर्च होत असल्याने त्याचे जेमतेम नियोजन होत आहे. शहरातील अतिक्रमण निर्मूलनासाठी पालिकेने एक नोव्हेंबरपासून पथक बनवून रस्तावरील कच्चे अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. पक्क्या अतिक्रमणांसाठी पोलीस आणि महसूल विभागाची मदत मिळाल्यास त्यांच्यावरही तोडक कारवाईचा बडगा उचलण्याचा इशारा आमदार रघुवंशी यांनी दिला. विरचक्क धरणावर जल पर्यटन स्थळ तयार करण्याच्या योजनेला राज्य शासनाची परवानगी मिळाली असून मंत्री शंभुराज देसाई यांच्याहस्ते नवरात्रीत त्याचे भूमिपूजन करणार असल्याचे रघुवंशी यांनी सांगितले.

नंदुरबारमध्ये गणेशोत्सवात यापुढे दहा फुटापेक्षा जास्त उंचीची मूर्ती नको तसेच गुलालावर देखील प्रतिबंध आला पाहिजे, अशी वैयक्तीक मागणी आहे. सध्या रस्त्यावर पडलेला गुलाल पालिकेकडून धुतला जात आहे. रस्ते धुण्याचे काम पालिकेचे नाही. मात्र व्यापारी आणि नागरिकांना होणारा त्रास पाहता गुलालावर आणि गणेश उत्सव काळातील आतिषबाजीवर निर्बंध आणले पाहिजेत, असे मत आमदार ऱघुवंशी यांनी मांडले.