नाशिक : शहर आणि ग्रामीण भागात अपघातांचा आलेख उंचावत असताना अपघातप्रवण क्षेत्रातील उपाय योजनांची गती मात्र संथच आहे. जिल्ह्यात १४६ अपघातप्रवण क्षेत्र असून तेथील उपाययोजनांबाबत आराखडे तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मुंबईहून शिर्डीला ये-जा करणारे बहुतांश वाहनधारक ज्या घोटी-सिन्नरमार्गे शिर्डी या रस्त्याचा वापर करतात, त्याची अवस्था फारशी चांगली नाही. काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरू असल्याने संपूर्ण वाहतूक एकाच बाजुने (एकेरी) वळविली जाते. शुक्रवारी जिथे अपघात झाला, तिथे हीच स्थिती होती. सिन्नर-शिर्डी मार्गावर दुभाजक असले तरी सिन्नर-घोटी रस्त्यावर काही भागाचा अपवाद वगळता ती व्यवस्थाही नाही.

घोटीहून शिर्डीकडे जाणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे १०० किलोमीटर रस्त्याचे दोन भाग आहेत. एक घोटी ते सिन्नर आणि दुसरा सिन्नर ते शिर्डी (पाथरेपर्यंत नाशिकची हद्द). घोटी-सिन्नर मार्ग देवळे या गावापर्यंतचा मार्ग बराच खराब आहे. पांढुर्ली गाव ओलांडल्यानंतर घाट लागतो. हा संपूर्ण टप्पा दुहेरी असला तरी या मार्गावरील गाव वगळता इतरत्र दुभाजक नाही. त्यामुळे वाहने थेट समोर येतात. सिन्नरहून शिर्डीकडे जाणारा मार्ग चारपदरी आहे. बरेचसे काम झाले असले तरी काही ठिकाणी दुरुस्ती प्रगतीपथावर आहे. या मार्गावर दुभाजक आहे. मात्र या रस्त्यावरील अपघातांची वेगळी कारणे स्थानिक सांगतात.

mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण
Due to the spread of concreting material on the highway traffic is still obstructed
महामार्गावर काँक्रिटीकरणाच्या साहित्याचा पसारा; वाहतुकीला अडथळे कायम

हेही वाचा – वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे नायलॉन मांजाविरोधात जनप्रबोधन

सिन्नर आणि पुढील मुसळगाव औद्योगिक वसाहतीचा परिसर सोडल्यानंतर वाहतूक विरळ होत जाते. रस्त्यालगत फारशी गावे नाहीत. त्यामुळे वाहनांचा वेग वाढतो. रात्रीच्या वेळी रस्ता पूर्णत: मोकळा असतो. त्यामुळे वाहने अतिशय वेगात मार्गक्रमण करतात. काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्यास वाहतूक एकाच बाजूने वळविली जाते. तिथे वेगाने येणाऱ्या वाहनधारकांचे नियंत्रण सुटण्याचा धोका असतो. परिसरात धुळीचे साम्राज्य असते. या परिस्थितीत वाहनधारक अंधारात कधीकधी विरुद्ध (चुकीच्या) मार्गिकेवर निघून जातात. शुक्रवारच्या अपघाताने दुहेरी मार्गावरील वाहतूक एकेरी मार्गावर परावर्तीत करताना त्याची पूर्वकल्पना वाहनधारकांना आधीच ठळकपणे मिळेल, याची व्यवस्था करण्याची निकड समोर आली आहे. वावी-पाथरेदरम्यान रस्त्याच्या कामामुळे टोल नाक्याच्या पुढे एकेरी वाहतूक आहे. तिथे वाहने समोरासमोर येतात. याच ठिकाणी खासगी प्रवासी बस आणि मालमोटार यांची समोरासमोर धडक झाली.

चार महिन्यांपूर्वी पंचवटीत औरंगाबाद महामार्गावरील कैलासनगर (मिरची हॉटेल) चौफुलीवर झालेल्या खासगी प्रवासी बस आणि मालवाहू वाहन (डंपर) अपघातात १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर नाशिक-पुणे रस्त्यावर शिवशाही बस आगीत भस्मसात झाली. यात प्रवासी सुखरूप बाहेर पडले. सिन्नरजवळील मोहदरी घाटात विचित्र अपघातात पाच महाविद्यालयीन विद्यार्थी ठार झाले होते. नंतर बस आणि दुचाकी यांच्या अपघातात दोघांना प्राण गमवावा लागला होता. औरंगाबाद रस्त्यावरील अपघातानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. तीन वर्षे रखडलेली खासदारांच्या अध्यक्षतेखालील रस्ता सुरक्षा समिती स्थापण्यात आली.

हेही वाचा – नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, ठाकरे गट शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता

शहर व जिल्ह्यात एकूण १४६ अपघातप्रवण क्षेत्र आहे. वारंवार अपघात होणाऱ्या क्षेत्रात तात्पुरती व दीर्घकालीन उपाययोजनांवर विचार विनिमय सुरू झाला. औरंगाबाद रस्त्यावरील अपघातस्थळी तातडीने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. शहरातील अशा ठिकाणी उपायांवर काम सुरू झाले. मात्र, ग्रामीण भागात उपाययोजनांनी तशी गती पकडलेली नाही.

जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांवर अनेक अपघातप्रवण क्षेत्र आहेत. प्रशासन याबाबत वारंवार आढावा घेते, पण उपायांची मात्रा अद्याप लागू झालेली नाही. औरंगाबाद रस्त्यावरील अपघातानंतर प्रादेशिक परिवहन आणि पोलिसांनी नियम धाब्यावर बसविणाऱ्या खासगी प्रवासी वाहतुकीविरोधात राबविलेली मोहीम काही दिवसांत थंडावली होती. रस्त्यांच्या दुरुस्ती कामांत वाहनधारकांना आधीच माहिती मिळेल, यादृष्टीने ठोस व्यवस्था करण्याची गरजही मांडली जात आहे.

हेही वाचा – नंदुरबार : पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरे बांधणाऱ्या लाभार्थ्यांची परवड; रक्कम मिळत नसल्याने उपोषणाचा इशारा

जिल्ह्यातील जवळपास १५० अपघातप्रवण क्षेत्रातील अपघात रोखण्यासाठी आराखडे तयार करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. त्यात वारंवार अपघात होणारी ठिकाणे व अन्य अशी विभागणी करण्यात आली. यावर तात्पुरते व दीर्घकालीन उपाय सुचविण्यासाठी प्रत्येक स्थळाचे आराखडे तयार केले जात आहेत. रस्त्याच्या रचना व बांधकामातील त्रुटी व तत्सम बाबींची पडताळणी होत आहे. काही अपघातप्रवण स्थळांचे आराखडे प्राप्त झाले असून यावर लवकरच पुढील कार्यवाही केली जाईल, असे खा. हेमंत गोडसे (अध्यक्ष, नाशिक जिल्हा रस्ता सुरक्षा समिती) यांनी सांगितले.