Premium

Dasara Melava 2022: विचित्र हातवारे करणाऱ्या शिंदे गटातील समर्थकांना ठाकरे गटातील महिलांचा चोप

मद्यधुंद अवस्थेत संबंधितांकडून हातवारे केले जात होते. त्यामुळे महिलांनी त्यांची जीप रोखली आणि चोप दिल्याचे शिवसेनेच्या शहर समन्वयक श्रध्दा दुसाने यांनी सांगितले.

Shisena Dasara Melava 2022 Clashes Between Shinde And Uddhav Thackeray Group On Nashik Mumbai Highway
Dasara Melava 2022: विचित्र हातवारे करणाऱ्या शिंदे गटातील समर्थकांना ठाकरे गटातील महिलांचा चोप

नाशिक : मुंबईतील दसऱ्या मेळाव्याला निघालेल्या शिंदे गटातील समर्थकांना नाशिक-मुंबई महामार्गावरील खर्डी येथे ठाकरे गटातील महिलांनी वाहन थांबवून चोप दिला. मद्यधुंद अवस्थेत संबंधितांकडून हातवारे केले जात होते. त्यामुळे महिलांनी त्यांची जीप रोखली आणि चोप दिल्याचे शिवसेनेच्या शहर समन्वयक श्रध्दा दुसाने यांनी सांगितले.शहरातील शिवसेना (ठाकरे) गटातील महिला दुपारी बसमधून मुंबईतील मेळाव्यासाठी निघाल्या होत्या. कसारा घाट ओलांडल्यानंतर बस पुढे गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी महामार्गावरून शिंदे गटाची जीप बससोबत समांतरपणे जात असताना जीपमधील शिंदे गटाच्या समर्थकांनी बसमधील महिलांकडे पाहून विचित्र हातवारे केले. शिवीगाळ केली. खिडकीत बसलेल्या महिलांना ही बाब लक्षात आली. त्यांनी बस चालकाच्या मदतीने खर्डी येथे संबंधितांची जीप रोखली. या जीपवर शिंदे गट मेळाव्याचे पत्रक चिकटविलेले होते. संतप्त महिलांनी जीपमधील चार ते पाच जणांना चोप दिला. ते सर्वजण मद्यधुंद अवस्थेत होते, असे दुसाने यांनी सांगितले. दरम्यानच्या काळात मेळाव्यास निघालेले शिवसैनिकही महिलांच्या मदतीला धाऊन आले. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिली जाणार असल्याचे दुसाने यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shisena dasara melava 2022 clashes between shinde and uddhav thackeray group nashik mumbai highway tmb 01

First published on: 05-10-2022 at 16:37 IST
Next Story
जळगाव : दाम्पत्याची भोंदूबाबाकडून साडेअकरा लाखांना फसवणूक