नळीतून गॅस गळती झाल्यानंतर सिलिंडरने पेट घेतल्यानंतर क्षणार्धात त्याचा स्फोट होऊन तीन घरांना आग लागल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातील वटार गावात घडली. घटनेत महिलेसह दोघे जखमी झाले. आगीत संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली आहे.  वटार येथील कैलास कोळी यांच्या घरात रात्री स्वयंपाक करीत असताना गॅस नळीने पेट घेतल्यानंतर क्षणार्धात सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर घराला आग लागली. आगीने रौद्र रूप धारण करीत शेजारील धनसिंग कोळी, भिकूबाई कोळी यांच्या घरांनाही आगीने लपेटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> निंबादेवी धरणात दोन बालके बुडाली; एकाचा मृत्यू 

आगीत कैलास कोळी, सरलाबाई कोळी जखमी झाल्या. चोपडा आणि जळगाव येथून तीन अग्निशमन बंब दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील वडगाव, सुटकार व वटार या गावांतील ग्रामस्थांनीही आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. घटनास्थळी नायब तहसीलदार सचिन भामरे, मंडळ अधिकारी व्ही. डी. पाटील, तलाठी महेंद्र पाटील, अडावद येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गणेश बुवा यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी धाव घेत पाहणी करीत पंचनामे केले. अडावद येथील पोलीस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking incident three houses cought fire after cylinder explosion zws
First published on: 31-05-2023 at 14:09 IST