जळगाव : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम जोरात सुरू झाला असून, उमेदवारांनी प्रचारालाही वेग दिला आहे. आता प्रचारासाठी अवघे १२ दिवस उरले आहेत. या निवडणुकीत प्रचारावेळी जनता आता मत मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना थेट प्रश्न विचारु लागल्याचे दिसून येत आहे. रावेर मतदारसंघातील महायुतीच्या भाजपच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनाही हा अनुभव घ्यावा लागला असून रावेर तालुक्यातील कोचूर येथे, त्या प्रचारासाठी गेल्या असता त्यांना जनतेचा रोष सहन करावा लागला.

महाविकास आघाडीतर्फे जळगाव मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून करण पवार आणि महायुतीतर्फे भाजपकडून स्मिता वाघ, तर रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीराम पवार विरुध्द भाजपच्या खासदार रक्षा खडसे अशी लढत होत आहे. दोन्ही बाजूंकडून राष्ट्रीय व राज्यस्तरावरील नेत्यांचे जिल्ह्यात दौरे वाढले आहेत. महाविकास आघाडी व महायुतीतर्फे आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कार्यकर्ते मेळावे, बैठका, जाहीर सभा घेतल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात वाहनांमुळे धुरळा उडाला आहे.

Controversy in Nashik Teacher Constituency Election candidate beaten up
नामसाधर्म्य असलेल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला मारहाण; नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला वादाचे ग्रहण
Mahayuti, Lok Sabha Election,
नोकर भरतीचा गोंधळ, सामाजिक योजनांना कात्री सरकारच्या अंगलट! विद्यार्थी आंदोलने, मागण्यांकडे दुर्लक्ष करणे सत्ताधाऱ्यांना भोवले
south central mumbai lok sabha constituency
धारावीत घटलेली मतदानाची टक्केवारी कोणाला फायदेशीर?
bjp promised us 80 to 90 seats in assembly polls says chhagan bhujbal
८० ते ९० जागा देण्याचा भाजपचा शब्द ; वादानंतर छगन भुजबळ यांचे स्पष्टीकरण
sanjay-shirsat
“६ जूननंतर आमच्याकडे इनकमिंग सुरू होणार”, शिरसाटांचा दावा; म्हणाले, “शरद पवार गटाला…”
bjp vs tmc kolkata high court
उच्च न्यायालयाचा भाजपाला दणका, तृणमूलविरोधातील अपमानजनक जाहिरातींवर बंदी; निवडणूक आयोगालाही खडसावलं
Loksabha Election 2024 Lalu Prasad Yadav campaign for daughters Misa Bharti Rohini Acharya
दोन मुली निवडणूक रिंगणात, पण चर्चा लालू प्रसाद यादवांना ‘किडनी देनेवाली बेटी’ चीच!
BJP worker threatens independent candidate Shiva Iyer from Dombivli who speaks against Modi
मोदींच्या विरोधात बोलणाऱ्या डोंबिवलीतील अपक्ष उमेदवाराला भाजप कार्यकर्त्याची धमकी

हेही वाचा…आता शक्ती प्रदर्शनाची चढाओढ, नाशिकमुळे महायुतीचा दिंडोरीचा अर्ज भरण्याचा मुहूर्त लांबणीवर

रावेर मतदारसंघात उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचार करीत आहेत. भाजपच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांचेही प्रचारदौरे सुरू आहेत. रावेर तालुक्यातील कोचूर गावात प्रचारासाठी त्या गेल्या असता ग्रामस्थांनी रक्षा खडसे यांना घेरत विरोध केला. संतप्त ग्रामस्थांनी त्यांना केलेल्या विकासकामांचा जाब विचारत समस्यांचा पाढाच वाचला. गावात चार विकासकामे दाखवा, असा प्रश्न संतप्त ग्रामस्थांनी विचारत, आपण आतापर्यंत किती विकासकामे केली, आपण निवडून आल्यानंतर काय काय विकासकामे करणार, अशा प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करीत वाद मिटविला. त्यानंतर रक्षा खडसे यांनी समर्थक कार्यकर्त्यांसह गावातून काढता पाय घेतला. आता मात्र यावरून सुज्ञ मतदार नेत्यांसह उमेदवारांना विकासकामांबाबत प्रश्न विचारू लागले आहेत. नेत्यांनाही आता जनतेला उत्तरे द्यावी लागत आहेत, असे दिसते आहे.