नाशिक : सिन्नर नगर परिषदेची प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे अभ्यासिका लवकरच शहरातील गरजवंत विद्यार्थ्यांसाठी खुली होणार आहे. अभ्यासिकेतील वाचन दालन आणि पुस्तकालयाच्या उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी ही माहिती देण्यात आली. भारत प्रतिभूती मुद्रणालय तथा दिल्ली येथील मुद्रांक निर्माण निगम लिमिटेडच्या अध्यक्ष तृप्ती घोष, मनुष्यबळ निदेशक एस. के. सिन्हा, मुख्य महाप्रबंधक सुधीर साहू, सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

भारत प्रतिभूती मुद्रणालय तथा नाशिक येथील मुद्रांक निर्माण निगम लिमिटेडच्या सीएसआर परियोजना अंतर्गत या अभ्यासिकेची निर्मिती करुन निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. उपलब्ध करून दिलेल्या निधी अंतर्गत तयार करण्यात आलेली अभ्यासिका पाहण्यासाठी दिल्लीहून अधिकारी आले. इमारतीचे कामकाज पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तृप्ती घोष यांनी या अभ्यासिकेतून अभ्यास करणारे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन यशस्वी व्हावेत आणि देशपातळीवर सिन्नर शहराचे नाव लौकिक करावे यासाठी शुभेच्छा दिल्या.

teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Nashik Education Department, Steps Up Efforts, Increase Voter, Turnout Through SVEEP Initiative, Systematic Voters Education and Electoral Participation program, students,
उन्हाळी सुट्टीतही एसव्हीईईपी उपक्रमासाठी धडपड
Two minor girls molested in a private tutoring class in nashik
नाशिक : खासगी शिकवणी वर्गात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

 खा. हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रयत्नातून सिन्नर शहरात अद्यावत अभ्यासिका उभारण्यासाठी भारत प्रतिभूती मुद्रणालयाच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. सिन्नर नगरपरिषदेचे किरण डगळे आणि इतर सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. १० डिसेंबर २०२१ रोजी या अभ्यासिकेस प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे नाव देण्यात आले होते. कार्यक्रमप्रसंगी भारत प्रतिभूती  मुद्रणालय, नाशिकचे विनोद महरिया, संयुक्त महाप्रबंधक (मनुष्यबळ) सचिन सोनी, उपप्रबंधक (मनुष्यबळ) सुमित पाटील, दिलीप पांचाळ आदी उपस्थित होते.