नाशिक – शिवाजी नगरजवळील फाशीचा डोंगर परिसरात दोन जणांना मारहाण करुन लूट करणाऱ्या सहा संशयितांना गंगापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले. अंगावरील सोन्याची साखळी, अंगठी, भ्रमणध्वनी, घड्याळ, रोख रक्कम बळजबरीने काढुन घेणाऱ्या इसमांना अटक करून त्यांच्याकडून चार लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी सहा संशयितांना ताब्यात घेतले.

सातपूर परिसरात शिवाजीनगर आहे. फाशीचा डोंगर परिसरात यश कोठावदे आणि त्यांचा मित्र वैभव हे मोटारीने गेले होते. रस्त्याच्या कडेला मोटार उभी करुन ते थांबले असताना तीन दुचाकींवर बसून आलेल्या सहा संशयितांनी त्यांना दमदाटी केली. यश यांना मारहाण करुन मोटारीवर दगड टाकून त्यांच्याकडील सोन्याची साखळी, अंगठी, भ्रमणध्वनी, घड्याळ, रोख रक्कम हिसकावून घेतली. यश यांच्या भ्रमणध्वनीवरून फोन पे, ॲपद्वारे आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न संशयितांनी केला. मात्र तो सफल झाला नाही. या लुटीसंदर्भात गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक माहिती घेवून संशयिताचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळवला असता तो यश रणधीर याच्या नावावर असल्याचे दिसले. त्याचा अंबड पोलीस ठाणे हद्दीत शोध घेतला असता तो फरार झाला. संशयित उल्हासनगर आणि नंतर मालेगाव येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

6th class student died due to dizziness in nashik
सहावीतील विद्यार्थिनीचा चक्कर येऊन मृत्यू
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
nashik youth, beaten up in love case
नाशिक : प्रेम प्रकरणातील मारहाणीमुळे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, संशयितास अटक
NCP MLA Rohit Pawar
“दोन दिवस थांबा, राज्याला हादरवून सोडणारा खुलासा…”, रोहित पवार यांचं मोठं विधान
Sania Mirza Marrying Mohammed Shami Rumors
सानिया मिर्झा व मोहम्मद शमीच्या लग्नाच्या चर्चांवर सानियाच्या वडिलांनी सोडलं मौन; म्हणाले, “ती त्याला भेटली..”
Rohit Sharma abused Rishabh Pant and badly scolds for Dropped Easy Catch of Mitchell Marsh Video Viral
ऋषभ पंतने सोपा झेल सोडल्याचे पाहता रोहितने भर मैदानात घातली शिवी, रागाने लालबुंद झालेल्या कॅप्टनचा VIDEO व्हायरल
What Bhujbal Said About Raj Thackeray ?
छगन भुजबळांचा राज ठाकरेंना सवाल, “बाळासाहेब आणि तुमचं रक्ताचं नातं, मग तुम्ही..”
Saurabh Netravalkar Exclusive Interview
“मला रंगांधळा म्हणत त्यांनी..”, सौरभ नेत्रावळकरने सांगितला भारत सोडण्याआधीचा किस्सा; म्हणाला, “दोन वर्षं मागितली..”

हेही वाचा >>>सहावीतील विद्यार्थिनीचा चक्कर येऊन मृत्यू

पोलिसांना मालेगाव कलेक्टर पट्टा परिसरात सापळा रचल्यावर भूषण गोलाईत (१९), कृष्णा दळवी (२०, रा. सिडको) हे पोलिसांच्या ताब्यात सापडले. त्यानंतर चार संशयित पंचवटी तसेच तपोवन परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून नीलेश कुमावत (२१, रा. पवननगर), आदिल खाटीक (२०, रा. तोरणा नगर), यश उर्फ सोनु रणधीर (१९, रा. कामटवाडा), चंदु आवळे (१९, रा. वनश्री कॉलनी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोन्याची लगड, सोन्याची अंगठी, तीन दुचाकी, भ्रमणध्वनी, घड्याळ असा चार लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील नीलेश कुमावत, भूषण गोलाईत हे सराईत गुन्हेगार आहेत.