scorecardresearch

Premium

धुळे : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गुटखा तस्करी; शिरपूर तालुक्यात मुद्देमाल जप्त

शिरपूर तालुका पोलिसांनी हाडाखेडा सीमा तपासणी नाक्यावर कंटेनर चालकासह ९० लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

smuggling of banned gutkha in maharashtra
प्रातिनिधिक छायाचित्र

महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची मध्यप्रदेशातून तस्करी होत असलयाचे पुन्हा एकदा उघड झाले असून शिरपूर तालुका पोलिसांनी हाडाखेडा सीमा तपासणी नाक्यावर कंटेनर चालकासह ९० लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती दोन ऑक्टोबरच्या मध्यरात्री शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक जयेश खलाणे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक तयार करून हाडाखेडा सीमा तपासणी नाक्यानजीक सापळा रचला होता.

हेही वाचा >>> नाशिक : पाण्यासह जनावरांसाठी आता चारा उपलब्ध, पांगरीतील गंभीर समस्येवर पालकमंत्र्यांची सूचना

new port at murbe marathi news, murbe new port marathi news, vadhavan port marathi news
विश्लेषण : कसे असेल मुरबे येथील नवीन बंदर? वाढवणजवळ दुसरे बंदर कशासाठी?
seeds worth 9 lakhs seized from farmers in Andhra Pradesh
आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांकडून ९ लाखांचे चोरबिटी बियाणे जप्त
hailstorm, Vidarbha, warning of rain, maharashtra
विदर्भात गारपीटीसह पावसाचे तांडव, आणखी दोन दिवस वादळी पावसाचा इशारा
maharashtra weather update in marathi, maharashtra rain marathi news, chances of rain in maharashtra marathi news
राज्याच्या ‘या’ भागांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज, हवामान खात्याकडून ‘येलो अलर्ट’

रात्री एक वाजता संशयित कंटेनर अडवून पोलिसांनी विचारणा केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे संशय बळावल्याने कंटेनर पोलीस ठाण्यात आणण्यात आला. अजीत अमरसिंग (३५, रा. ग्राम नागला, जि.महामायानगर, उत्तर प्रदेश) असे चालकाचे नाव असल्याचे सांगण्यात आले. ६५ लाख ३५ हजार रुपये किमतीचा गुटखा आणि २५ लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण ८९ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात  चालक अजीत अमरसिंगविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयेश खलाणे, उपनिरीक्षक संदीप पाटील, हवालदार संजय माळी, संदीप ठाकरे, अल्ताफ मिर्झा,अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Smuggling of banned gutkha in maharashtra from madhya pradesh police seized gutkha worth rs 90 lakh zws

First published on: 03-10-2023 at 14:21 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×