लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जळगाव: जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी दोन कोटी रुपये निधीतून ११ रुग्णवाहिकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याने लवकरच त्या रुग्णांच्या सेवेसाठी दाखल होणार आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह त्यांच्या अखत्यारीत असलेल्या उपकेंद्राच्या माध्यमातून आरोग्यसेवा देण्यात येत आहे. मात्र, काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असलेल्या रुग्णवाहिका नादुरुस्त होत्या. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी काही रुग्णवाहिका मिळाव्यात, अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार पालकमंत्री पाटील यांनी याबाबत दखल घेऊन दोन कोटी निधीची डीपीडीसीमार्फत तरतूद केली होती.

आणखी वाचा- वादळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यात ५६२ हेक्टर पीक नुकसान- कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल

यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात ११ ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध होणार असून, यात म्हसावद (ता. जळगाव), साळवा (ता. धरणगाव), शेंदुर्णी (ता. जामनेर), मारवड (ता. अमळनेर), किन्ही (ता. भुसावळ), ऐनगाव (ता. बोदवड), वाघळी (ता. चाळीसगाव), हातेड (ता. चोपडा), तळई (ता. एरंडोल), लोहारा (ता. रावेर), सावखेडासिम (ता. यावल) येथील प्राथमिक केंद्रांसाठी प्रत्येकी १७ लाख रुपये निधीची आधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध होणार असल्याने रुग्णांसाठी याचा फायदा होणार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soon 11 ambulances will available for health canters in jalgaon district mrj
First published on: 19-03-2023 at 11:49 IST