लोकसत्ता वार्ताहर

धुळे: साक्री तालुक्यातील निजामपूरजवळील चिखलीपाडा येथे चमकणारी मेणबत्ती (स्पार्कल कॅण्डल) बनविण्याच्या कारखान्याला मंगळवारी दुपारी आग लागून चार महिलांचा होरपळून मृत्यू झाला. एका महिलेसह एक मुलगी गंभीर आहे. त्यांना नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Nashik, Girl died falling into bucket,
नाशिक : पाण्याच्या बादलीत पडून बालिकेचा मृत्यू
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
high court ask Questions to bmc and sent notice over Tragic Deaths of children in Wadala
दोन मुलांच्या मृत्यूचे प्रकरण: मुंबईत मानवी जिवाची किंमत काय? उच्च न्यायालयाचा महापालिकेला प्रश्न
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना

चिखलीपाड्यात लहानशा एका खोलीत चमकणारी मेणबत्ती बनविण्याचा कारखाना आहे. त्या ठिकाणी साक्री तालुक्यातील जैताणे गावातील महिला कामगार कामाला आहेत. मंगळवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास कारखान्यात शॉर्टसक्रिट होऊन आग लागली. आगीची ठिणगी कच्चा मालावर पडल्याने आग अधिकच भडकली. त्यात त्या ठिकाणी काम करणार्‍या आशाबाई भागवत (३४), पूनम भागवत (१६), नैनाबाई माळी (४८), सिंधुबाई राजपूत (५५) सर्व रा.जैताणे ता.साक्री या चार जणींचा होरपळून मृत्यू झाला. संगीता चव्हाण (५५) या ७० टक्के आणि निकीता महाजन (१८) ही ३० टक्के भाजली आहे.

आणखी वाचा- जळगाव: कोतवालसह खासगी व्यक्तीला लाच घेताना अटक

हा कारखाना रोहिणी कुवर (रा.पुणे) यांचा असून, कारखान्याचा कारभार जगन्नाथ कुवर (रा.वासखेडी, ता.साक्री) हे पाहत असल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कारखान्यासाठी आवश्यक परवानग्या कुवर यांनी घेतल्या होत्या का, याची चौकशी करण्यात येत आहे.