scorecardresearch

जळगाव: राज्यभरात ७ हजार ८९१ चिमण्यांची नोंद; निसर्गमित्र संस्थेच्या ऑनलाइन गणना मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

निसर्गमित्र संस्थेतर्फे जागतिक चिमणी दिनानिमित्त महाराष्ट्रव्यापी ऑनलाइन चिमणी गणना मोहीम राबविण्यात आली.

sparrow
राज्यभरात ७ हजार ८९१ चिमण्यांची नोंद

निसर्गमित्र संस्थेतर्फे जागतिक चिमणी दिनानिमित्त महाराष्ट्रव्यापी ऑनलाइन चिमणी गणना मोहीम राबविण्यात आली. त्यात राज्यभरातील ३१, तर अन्य राज्यांतील दोन, अशा ३३ जिल्ह्यांतील नागरिकांनी सहभाग घेऊन सुमारे सात हजार ८९१ चिमण्यांची नोंद केल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी शुक्रवारी येथे दिली. मोहिमेत मध्य प्रदेश व कर्नाटकमधील पक्षीप्रेमींनीही सहभाग नोंदविला.

हेही वाचा >>>नाशिक: जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येत वाढ – एकाच दिवसात १८ जण संक्रमित

चिमणी गणना मोहिमेत सहभागी जिल्ह्यांत नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे २७५ नागरिकांनी १८ ते २० मार्चदरम्यान राबविण्यात आलेल्या मोहिमेत सहभाग घेतला होता. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील ७०, पुणे २७, कोल्हापूर २५, सांगली २४, नगर २२, नाशिक १६, धुळे १२, ठाणे १२, मुंबई आठ, अमरावती आठ, यवतमाळ पाच, लातूर चार, सोलापूर चार, चंद्रपूर चार, पालघर तीन, अकोला तीन, सातारा सात, भंडारा तीन, नागपूर दोन, रत्नागिरी दोन, वाशिम दोन, रायगड दोन, बुलडाणा दोन, नंदुरबार दोन, छत्रपती संभाजीराजेनगर दोन, जालना एक, गोंदिया एक, वर्धा एक, नांदेड एक, सिंधुदुर्ग एक, हिंगोली एक, तसेच मध्य प्रदेशातील भोपाळ आणि कर्नाटक येथील बंगळुरूमधून प्रत्येकी एक याप्रमाणे नागरिकांचा सहभाग होता.

हेही वाचा >>>नाशिक : मुलीचा वडिलांकडे असलेली ओढ पाहता आई कडून चिमुकलीचा खून

गणना मोहिमेत सर्वाधिक चिमण्या सहा जिल्ह्यांमध्ये नोंदविण्यात आल्या. त्यात जळगाव एक हजार ७०३, पुणे एक हजार ३४७, नाशिक एक हजार १८३, सांगली ६१३, कोल्हापूर ५७५ आणि नगर येथे ३३१ चिमण्या नोंदविण्यात आल्या. ही गणना मोहीम तीन दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी सकाळी साडेसहा ते साडेनऊ किंवा दुपारी साडेचार ते सायंकाळी साडेसहा या वेळेत किमान पंधरा मिनिटे वेळ देऊन करावयाची होती.

राज्यभरात चिमणी गणना मोहीम राबविण्यामागे चिमण्यांची संख्या आपल्या भागात किती, हे समजून घ्यावी, तसेच चिमण्या का कमी होत आहेत याविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि चिमणीविषयी प्रेम व पर्यावरणाविषयी आस्था वाढावी, असे उद्देश होते. मोहीम ऑनलाइन राबविण्यात आली. त्यासाठी राज्यभरातील पक्षी व प्राणीप्रेमींसह नागरिकांना त्यासंदर्भातील लिंक पाठविण्यात आली होती. – पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ (अध्यक्ष, निसर्गमित्र संस्था, जळगाव)

Nashik News (नाशिक / उत्तर महाराष्ट्र न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 15:35 IST

संबंधित बातम्या