जळगाव : सप्तश्रृंग गडाकडे जाणाऱ्या दिंडीवर पाळधीत दगडफेक; तीनजण जखमी

शहरातून नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंग गडावर जाणाऱ्या दिंडीवर मंगळवारी रात्री धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे काही समाजकंटकांनी दगडफेक केली.

Stone pelting on dindi paldhi
सप्तश्रृंग गडाकडे जाणाऱ्या दिंडीवर पाळधीत दगडफेक; तीनजण जखमी (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

जळगाव – शहरातून नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंग गडावर जाणाऱ्या दिंडीवर मंगळवारी रात्री धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे काही समाजकंटकांनी दगडफेक केली. त्यात तीन भाविक जखमी झाले. या धुमश्‍चक्रीत १२ ते १५ मोटारींसह दुचाकी व काही दुकानांची तोडफोड झाली. दगडफेक करणार्‍यांवर कारवाईसाठी जमाव पोलीस दूरक्षेत्र ठाण्यावर धडकला. सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

घटनेची माहिती गावात मिळाल्यानंतर काहीजणांनी पाळधी पोलीस दूरक्षेत्र गाठत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. हे प्रकरण पोलिसांकडून हाताळले जात असतानाच, गावात समोरासमोर आलेल्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर तुफान दगडफेक झाली. दगडफेकीत पोलिसांच्या वाहनासह पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे यांच्या मोटारीचीही तोडफोड करण्यात आली.

हेही वाचा – नाशिक महापालिकेचे २४७७ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर; प्रशासकीय राजवटीत प्रारूप आणि अंतिम अंदाजपत्रक एकसमान

हेही वाचा – अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्यास पालकांना कारावास; अपघात रोखण्यासाठी आरटीओची विशेष मोहीम

जळगाव, धरणगाव आणि चोपडा येथून पोलिसांचा फौजफाटा मागविण्यात आला. जळगावमध्ये या घटनेची माहिती होताच काहीजणांनी पाळधीकडे धाव घेतली. मात्र, पोलिसांनी वाहनांची तपासणी करीत अनेकांना माघारी परत पाठविले. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रात्रीच पोलिसांनी ज्या भागात दगडफेक झाली तेथील संशयितांची धरपकड सुरू केली. गावातील प्रत्येक चौकात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 12:00 IST
Next Story
अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्यास पालकांना कारावास; अपघात रोखण्यासाठी आरटीओची विशेष मोहीम
Exit mobile version