scorecardresearch

कामयानीसह तीन एक्स्प्रेस गाड्यांना नांदगाव थांबा मंजूर

जनता, कुशीनगर आणि कामयानी या एक्स्प्रेस गाड्यांना नांदगाव रेल्वे स्थानक येथे अखेर थांबा मंजूर करण्यात आला आहे.

Nandgaon express trains
कामयानीसह तीन एक्स्प्रेस गाड्यांना नांदगाव थांबा मंजूर (प्रातिनिधिक संग्रहित छायाचित्र)

नांदगाव – जनता, कुशीनगर आणि कामयानी या एक्स्प्रेस गाड्यांना नांदगाव रेल्वे स्थानक येथे अखेर थांबा मंजूर करण्यात आला असून, आठ एप्रिलपासून या एक्स्प्रेस नांदगाव येथे थांबणार आहेत.

करोना प्रादुर्भावामुळे टाळेबंदीत रेल्वे प्रशासनाने अनेक रेल्वे गाड्यांचे थांबे रद्द केले होते. त्यात जनता, गोरखपूर कुशीनगर आणि कामयानी या गाड्यांचा नांदगाव येथील थांबा रद्दचा समावेश होता. करोना प्रादुर्भाव कमी झाल्याने रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय विचारात घेऊन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे या एक्स्प्रेस गाड्यांचा नांदगाव येथील थांबा मंजूर करण्याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यावर रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सकारात्मक भूमिका घेऊन रेल्वे प्रशासनास सदरच्या रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्यासाठी आदेश दिले. त्यानुसार रेल्वे मंडळाचे संयुक्त निदेशख विवेक कुमार सिन्हा यांनी त्याबाबतचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा – जळगाव : नशिराबादमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंतीखाली दबून मुलाचा मृत्यू

हेही वाचा – धुळ्यात चाळीसगाव चौफुलीवर उड्डाणपुलासाठी निधी मंजूर

पाटणा-लोकमान्य टिळक जनता एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक-बनारस एक्स्प्रेस आणि लोकमान्य टिळक-गोरखपूर कामयानी एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांचे नांदगाव येथील थांबे पूर्ववत सुरू झाले आहे. या कृतीचे नियमितपणे रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी, कर्मचारी तसेच नांदगावकर जनतेने स्वागत केले आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 13:43 IST

संबंधित बातम्या