नाशिक, जळगाव, धुळे – रविवारी दुपारी बारानंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि बागलाण तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात दुपारनंतर अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने दाणादाण उडाली. थोड्याच वेळात पावसानेही हजेरी दिली. जळगाव जिल्ह्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही भागांत गारपीटही झाली. झाडे उन्मळून पडल्याने वाहने दबली गेल्याने नुकसान झाले. धुळे जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला.

दुपारी बारानंतर अचानक वातावरणात बदल होऊन नाशिक जिल्ह्यातील बागलाण आणि मालेगाव तालुक्यात वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली. पिंपळकोठे, द्याने, नामपूर, दाभाडी, पिंपळगाव, मालेगाव या भागात वादळी वाऱ्यांचा जोर अधिक होता. पावसानेही हजेरी लावली. उघड्यावर असलेल्या कांद्याचे नुकसान झाले. आंब्यांवरील कैऱ्या गळून पडल्या.

Marathi paper viral
यवतमाळ : पाटणबोरीत मराठीचा पेपर भ्रमणध्वनीवरून सार्वत्रिक
Explosion tire shop near Sangola
सोलापूर : सांगोल्याजवळ टायर दुकानात स्फोट; एकाचा मृत्यू, दुसरा जखमी
kolhapur fight between two groups , kolhapur violence marathi news,
कोल्हापूर : कागल तालुक्यातील व्हनाळी यात्रेत दोन गटांत मारहाण; अ‍ॅट्रोसिटीसह परस्परविरोधी गुन्हे दाखल
Unseasonal rain in some parts of Nashik district
नाशिक जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पाऊस, गारपीट

हेही वाचा – नंदूरबार, धुळे, नाशिकला हवामान विभागाचा इशारा; दुपारनंतर वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता

जळगाव शहर परिसरात वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे मोटारींसह दुचाकी चालविणे जिकिरीचे झाले होते. विजांचाही कडकडाट होत होता. शहरातील महात्मा गांधी उद्यान, महाबळ, रिंग रोड, शासकीय अजिंठा विश्रामगृह, गोलाणी व्यापारी संकुल, फुले व्यापारी संकुलासह शिवाजीनगर, इंद्रप्रस्थनगर, पिंप्राळा उपनगरात झाडे उन्मळून पडली. काही भागात झाडांखाली मोटारींसह दुचाकीही दबल्या गेल्याने नुकसान झाले. शासकीय अजिंठा विश्रामगृह आवारातील वाहनतळात झाड उन्मळून पडल्याने मोटारींसह दुचाकी दाबल्या गेल्या. वीजताराही तुटल्या होत्या. त्यामुळे पुरवठाही खंडित झाला होता.

काही दिवसांपूर्वी तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे उकाड्याने जळगावकर हैराण झाले होते. रविवारी सकाळी उन्हाचे चटके बसत असतानाच दुपारी वादळी वारे वाहू लागले. त्यामुळे वातावरणात गारवा वाटत असून, वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पाचोरा शहरासह तालुक्यातील सांगवी येथे गारपीट झाली. पाचोरा शहरात काही भागांत घरांवर झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाले. रावेर तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सावदा परिसरात गारपीट झाली.

यावल तालुक्यात रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक बंद झाली होती. यावल-चोपडा मार्गासह किनगाव, डांभुर्णी, यावल, फैजपूर या मार्गांवर झाडे उन्मळून पडल्याने सुमारे तीन-चार तास वाहतूक बंद झाली होती. युद्धपातळीवर झाडे मार्गावरून हटविण्यात आली. फैजपूर, न्हावी, आमोदा, डोंगरकठोरा, वाघझिरा, नायगाव यांसह इतर ठिकाणीही गारपिटीचा तडाखा बसला. केळी पिकांचे सुमारे हजारावर हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, यात पाच ते सहा कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. केळी पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा – नाशिक : संत निवृत्तीनाथ पालखीचे नाशिककरांकडून उत्स्फुर्त स्वागत; मनपाकडून स्वागतासाठी तीन लाखांचा निधी

जळगावात दुपारनंतर तर, धुळे शहर परिसरात सकाळी साडेदहा वाजताच विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी, शेतकऱ्यांची त्यामुळे तारांबळ उडाली. पावसामुळे वीज खंडित झाली. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. दरम्यान, रविवारपासून पुढील तीन दिवस जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. खानदेशात आठ जूनपर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.