जळगाव – जामनेर तालुक्यातील पहूर – शेंदुर्णीदरम्यान शुक्रवारी  सकाळी सातच्या सुमारास शालेय बस उलटून  विद्यार्थ्यांसह शिक्षक जखमी झाले आहेत. बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात आले. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, जामनेर तालक्यातील पहूर- शेंदुर्णीदरम्यान घोडेश्‍वर बाबा मंदिराजवळ सकाळी सातच्या सुमारास सरस्वती विद्यामंदिराची बस उलटली. बसमध्ये ४० ते ४५ विद्यार्थी व दोन शिक्षक जखमी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> जळगाव: पाळधी दगडफेक प्रकरणी १६ जणांना पोलीस कोठडी – गावात अजूनही संचारबंदी

अपघाताची माहिती मिळताच पहूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय बनसोड यांच्यासह कर्मचार्‍यांनी धाव घेतली. परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी येत मदतकार्य सुरू केले. अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांना खासगी वाहनांमधून पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीने प्रथमोपचार करण्यात आले. काही विद्यार्थ्यांना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातातील जखमींपैकी कुणाची प्रकृती गंभीर नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.  अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीती व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students and teachers injured as school bus overturns in jamner taluka zws
First published on: 31-03-2023 at 10:48 IST