scorecardresearch

Premium

पारोळ्यातील पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना जाळ्यात

जयवंत पाटील (५४) असे लाचखोर उपनिरीक्षकाचे नाव आहे.

sub-inspector Parola police station caught bribery case jalgaon
पारोळ्यातील पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना जाळ्यात

लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: गुन्ह्यात दोषारोपपत्र तातडीने दाखल करण्यासाठी, तसेच गुन्ह्यात नातेवाइकांना अटक न करण्यासाठी तडजोडीअंती आठ हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

pune ganesh visarjan, puneri pati at ganesh visarjan, reel star atharva sudame in visarjan, atharva sudame puneri pati
‘ही श्रींची मिरवणूक आहे, बायको माहेरी गेल्यासारखे नाचू नका…’ पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत अनोखी पुणेरी पाटी
superintendent school complained girls molested tribal ashram school wardha
वर्धा: आदिवासी आश्रमशाळेत मुलींचा विनयभंग?
parineeti chopra flaunts her mangalsutra
थाटामाटात लग्न केल्यावर परिणीती चोप्रा पोहोचली सासरी, गळ्यातील हटके मंगळसूत्राने वेधलं लक्ष
girl student molested amravati
शिक्षकी पेशाला काळीमा! अमरावतीतील नामांकित शाळेतील शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; गुन्हा दाखल

जयवंत पाटील (५४) असे लाचखोर उपनिरीक्षकाचे नाव आहे. धुळे जिल्ह्यातील अंचाळे येथील तक्रारदारांवर व त्यांच्या नातेवाइकावर पारोळा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात यातील तकारदार व त्यांच्या नातेवाइकांना अटक न करण्यासाठी, तसेच न्यायालयात दोषारोपपत्र लवकरात लवकर पाठविण्यासाठी तक्रारदारांकडे ३० हजारांची मागणी करून, २० हजार रुपये घेतले होते.

हेही वाचा… नाशिक शहरात माफक दरात शाडू मूर्ती उपलब्ध करण्याची तयारी; महापालिका विभागीय कार्यालयात मूर्तीकारांना मोफत जागा

उर्वरित १० हजार रुपये नंतर घेऊन या, असे सांगितले होते. याबाबतची तक्रार जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आल्यानंतर तक्रारीची पडताळणी करण्यात आली. मंगळवारी पंचांसमक्ष १० हजारांची मागणी करून तडजोडअंती आठ हजार रुपये स्वीकारताना उपनिरीक्षक पाटील यास पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी पारोळा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sub inspector of parola police station caught in bribery case in jalgaon dvr

First published on: 13-09-2023 at 14:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×