scorecardresearch

पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर यांना राष्ट्रपती पोलीस पदक

कडनोर यांनी केलेल्या गुन्ह्यांच्या तपासांपैकी १२ गंभीर गुन्ह्यात आरोपींना शिक्षा झाली आहे. २०१७ मध्ये त्यांना पोलीस महासंचालकांकडून पदक आणि प्रशंसापत्र देत सन्मानित

Dattatraya Kadnor Sub-Inspector of Police
पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर

नाशिक शहर पोलीस दलातील उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर यांना विशेष सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. कडनोर सध्या मध्यवर्ती गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर या पदकांची घोषणा करण्यात आली. 

हेही वाचा- गोद्रीत महाकुंभला प्रारंभ, तीन हजार तांड्यांवर बंजारा समाजाचे धर्मांतर; सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात आणणार – बाबूसिंगजी महाराज

कडनोर हे पोलीस खात्यात हवालदार म्हणून एक जून १९९१ रोजी भरती झाले. सेवाकाळात देवळाली कॅम्प, नाशिकरोड, सरकारवाडा, भद्रकाली, विशेष शाखा, मुंबई नाका पोलीस ठाणे आणि मध्यवर्ती गुन्हे शाखा येथे नोकरी करीत असताना त्यांनी खून, चोरी, घरफोडी व दरोडा यासारख्या गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी मदत केली. नाशिकरोड पोलीस ठाणे येथे कार्यरत असताना १५ गावठी बंदुका तसेच भद्रकाली पोलीस ठाणे येथे असताना ६५ दुचाकी हस्तगत केल्या होत्या. त्यांनी केलेल्या गुन्ह्यांच्या तपासांपैकी १२ गंभीर गुन्ह्यात आरोपींना शिक्षा झाली आहे. २०१७ मध्ये त्यांना पोलीस महासंचालकांनी पदक आणि प्रशंसापत्र देत सन्मानित केले होते. 

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 12:09 IST
ताज्या बातम्या