लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव : सातबारा उताऱ्यावर वारसांचे नाव लावण्यासाठी दीड हजाराची लाच स्वीकारताना भडगाव तालुक्यातील भोरटेक येथील प्रभारी तलाठ्यासह महिला कोतवालास जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी भडगाव येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

pune police warning goons after Salman Khan House Firing Case
सलमान खानच्या घराजवळ गोळीबार, पुण्यातल्या ‘भाईं’ची झाडाझडती
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Crime against four for polluting Pavana river
पिंपरी : पवना नदी प्रदूषित करणाऱ्या चौघांवर गुन्हा

तक्रारदार हे भडगाव तालुक्यातील भोरटेक बुद्रुक येथील रहिवासी असून, त्यांच्याकडे वडिलोपार्जित शेतजमीन आहे. शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वारसांची नावे लावण्यासाठी तक्रारदारांनी भोरटेक बुद्रुक येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. वारसांची नावे लावण्यासाठी तलाठी सलीम अकबर तडवी (४४, रा. भडगाव) यांनी सुरुवातीला एक हजाराची लाच घेतली होती. त्यानंतर पुन्हा तक्रारदारांकडे दीड हजाराची मागणी कोतवाल कविता सोनवणे (२७, रा. तांदलवाडी, ता. भडगाव) यांनी केली.

हेही वाचा…. शिंदखेड्यातील व्यापाऱ्याची फसवणूक; गुजरातच्या दोघांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा…. परिवहन विभागाकडून वर्षभरात सात कोटींपेक्षा अधिक दंड वसूल

त्यानंतर तक्रारदारांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या पडताळणीसाठी पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी पथक नियुक्त करीत भोरटेक येथील तलाठी कार्यालयात सापळा रचला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुटी असली, तरी सुटीच्या दिवशी शासकीय कामे करण्यासाठी तलाठी, कोतवाल हे तलाठी कार्यालयात होते. त्यावेळी तक्रारदारांकडून दीड हजाराची लाच घेताना पथकाने दोघांना रंगेहात पकडले. याप्रकरणी तलाठी तडवी व कोतवाल सोनवणे यांच्याविरुद्ध भडगाव येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.