मागण्यांविषयी १९ जानेवारीला शिक्षणाधिकाऱ्यांसमवेत बैठक

नाशिक : वेतन पथक अधीक्षक उदय देवरे यांची नाशिक जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी, यासह माध्यमिक शिक्षकांच्या इतर विविध मागण्यांसाठी जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीच्या (टीडीएफ) वतीने सोमवारी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात येणार होते. परंतु, करोना संसर्ग, पोलिसांची नियमावली यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले असून आता १९ जानेवारी रोजी या संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार असल्याची माहिती टीडीएफ संघटनेच्या वतीने देण्यात आली.

haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
BJP candidate Ramdas Tadas has two offices in the city without obeying the order of Amit Shah
अमित शहांचा आदेश पाण्यात, भाजप उमेदवाराची शहरात दोन कार्यालये
Inquiry into deterioration of health of police trainees Neelam Gorhes letter to Home Minister
पोलीस प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती बिघडल्याप्रकरणी चौकशी; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र
nashik district head masters union, disbursement of differential payments
नाशिक : शिक्षक-शिक्षकेतरांची फरक देयके त्वरीत द्यावीत, जिल्हा मुख्याध्यापक संघाची मागणी

जिल्ह्यातील आदिवासी उपयोजन भागातील काही शाळांचे तसेच अनेक माध्यमिक शाळांचे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील पगार दोन ते तीन महिने उशिराने होत आहेत. याशिवाय वैद्यकीय देयके आणि अन्य प्रलंबित कामे वेतन पथकाकडे अडकली आहेत. याबाबत वेतन पथक कार्यालयात विचारणा केल्यास त्यांच्याकडून पैसे मागण्यात येत असल्याच्या शिक्षकांच्या तक्रारी आहेत. माध्यमिक शिक्षक संघ आणि टीडीएफच्या वतीने याबाबत आवाज उठविला असता वेतन पथक अधीक्षकांकडून अरेरावी करण्यात आल्याचा पदाधिकाऱ्यांचा आक्षेप आहे. याविरोधात सोमवारपासून टीडीएफच्या वतीने उपोषण करण्याचा इशारा दिला  गेला होता.

शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी संघटनेचे पदाधिकारी गेले असता भद्रकाली पोलिसांनी धाव घेतली. करोना नियम पाहता आंदोलन स्थगित करण्याची सूचना केली. तसेच शिक्षणाधिकारी कदम उपस्थित नसल्याने माध्यमिक विभाग अधीक्षक सुधीर पगार यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. आंदोलनकर्त्यांनी वेतन पथक अधीक्षक देवरे यांची तात्काळ नाशिक जिल्ह्यातून बदली करण्यात यावी,  विधायक कार्य समिती, सटाणा येथील ३९ कर्मचाऱ्यांचे वेतन सुरू करण्यात यावे, तसेच या संस्थेतील इतर कर्मचाऱ्यांची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत. एक एप्रिल २०१८ पासून वेतन पथक कार्यालयाची खास पथकामार्फत पारदर्शकपणे चौकशी करण्यात यावी.

सातव्या वेतन आयोगासह वरिष्ठ श्रेणी, निवडश्रेणी, प्रोत्साहन, सेवा पुस्तकाची दुसरी प्रत शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना दिलेली आहे, याबाबत मार्च महिन्याचे वेतन देयक स्वीकारतांना मुख्याध्यापकांचे हमीपत्र घेण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या. शिक्षणाधिकारी उपस्थित नसल्याने १९ जानेवारी रोजी शिक्षणाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. तोपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती टीडीएफच्या वतीने देण्यात आली.