मालेगाव – चार वेळा विजयी झालेल्या दादा भुसे यांना यंदा दुप्पट मताधिक्याने निवडून द्या, मी तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

महायुतीचे उमेदवार तथा पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रचारार्थ रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांची येथे जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी, आपण जे बोलतो ते करून दाखवतो, अशी पुस्ती जोडली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांपासून फारकत घेतल्याने आम्हाला महाविकास आघाडीच्या सरकारमधून बाहेर पडून भाजपबरोबर सत्ता स्थापन करावी लागल्याचे नमूद करत हे सरकार स्थापन केले नसते तर, दोन वर्षात जनतेच्या कल्याणासाठी ज्या अनेक चांगल्या योजना राबविल्या गेल्या, त्या राबविता आल्या नसत्या, असा दावा शिंदे यांनी केला. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथील सभेत भुसे यांच्यावर टीका करताना मालेगावात भुसा पाडायला आलो, असा शब्दप्रयोग केला होता. त्याअनुषंगाने शिंदे यांनी, दोन वर्षांपूर्वीच आम्ही त्यांचा भुसा पाडला, असे प्रत्युत्तर दिले. महायुतीचे सरकार हे जनतेच्या मनातील सरकार असल्याने या निवडणुकीत महायुतीला किमान १६० जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Crime against city president of Shinde group fraud of Rs 1 crore 56 lakh by lure of job
शिंदे गटाच्या शहराध्यक्षाविरुद्ध गुन्हा, नोकरीचे आमिष दाखवून…
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
dcm eknath shinde loksatta news
“सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
Eknath Shinde Shivsena Welcomes NCP Congress Leaders in Party
एकनाथ शिंदेंचा शरद पवार व काँग्रेसला दणका, नाशिकमधील मोठ्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
Eknath shinde
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीचे संकेत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढल्या जाणार
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”

हेही वाचा >>>अभिनेता गोविंदा छातीत दुखू लागल्याने रोड शो अर्धवट सोडून मुंबईत परत

नाशिक मर्चंट सहकारी बँकेच्या मालेगाव शाखेत १२ गरीब तरुणांच्या खात्यात सुमारे १२५ कोटींची संशयास्पद उलाढाल झाल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. हे पैसे कुठून आले, कुठे गेले याचा संपूर्ण तपास करून दोषींचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असा इशारा शिंदे यांनी दिला. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला या अडचणीतून बाहेर काढून ठेवीदारांना न्याय दिला जाईल,असे आश्वासनही शिंदे यांनी दिले.

Story img Loader