नाशिक – दिंडोरी तालुक्यातील आशेवाडीतील रामशेज किल्ल्याचा पायथा, शहरातील सर्व प्रभाग व आरोग्य उपकेंद्र, पोलीस ठाणे व वसाहती, नाशिकरोड रेल्वे स्थानक ते जिल्हा शासकीय रुग्णालय, देवळाली छावणी मंडळ परिसर, शाळा व महाविद्यालयांचे प्रांगण, अशा विविध ठिकाणी रविवारी स्वच्छता हिच सेवा उपक्रमाअंतर्गत स्वच्छतेचा जागर करण्यात आला.

मोहिमेत सहभागी झालेल्या अनेक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा भर स्वत:चे छायाचित्र टिपण्यावर होता. स्वच्छतेपेक्षा मोहिमेत सहभागी झाल्याचा दाखला देण्यास त्यांच्याकडून अधिक प्राधान्य दिले गेल्याचे पाहायला मिळाले. स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आशेवाडीतील स्वच्छतेचे इतर गावांनीही अनुकरण करावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – जळगाव: साने गुरुजींच्या कर्मभूमीत गोडसे, भिडे यांच्या प्रतिमांसह नृत्य; अमळनेरात विसर्जन मिरवणुकीतील प्रकार उघड

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त एक दिवस, एक तास स्वच्छतेसाठी उपक्रमात शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. रामशेज किल्ला, आशेवाडी येथे जिल्हास्तरीय उपक्रमाची सुरुवात केंद्रीयमंत्री डॉ. भारती पवार, जिल्हाधिकारी जलज शर्मा, ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्या समवेत करण्यात आली. घरासोबत आपला परिसर व आपले गाव स्वच्छ राहील यादृष्टीने नागरिकांनी पुढे येऊन इतरांनाही प्रेरणा मिळेल, असे काम केले पाहिजे, असे डाॅ. पवार यांनी सांगितले. आशेवाडी गावाला रामशेज किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा आहे. हा वारसा पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने वन विभागाशी चर्चा करून प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी शर्मा यांनी संकलित केलेल्या कचऱ्याची विल्हेवाटही योग्य पद्धतीने लावणे तितकेच गरजेचे असल्याचे सांगितले. अभियानाचा प्रारंभ राजशेज किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून करण्यात आला. वृक्षारोपण करण्यात आले तसेच किल्ल्याच्या पायथ्याशी स्वच्छता करण्यात आली.

रेल्वे प्रशासनातर्फे स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत रविवारी नाशिकरोडसह भुसावळ विभागातील सर्व रेल्वे स्थानकांत स्वच्छता मोहीम राबविली गेली. त्यात आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी, रोटरी क्लबचे सदस्यांनीही श्रमदानात सहभाग नोंदविला. क्रेडाई नाशिक मेट्रोने ठक्कर बाजार, मेळा व महामार्ग बस स्थानकात स्वच्छता मोहीम राबविली. पोलीस आयुक्त कार्यालय, परिमंडळ कार्यालय, पोलीस ठाणे व पोलीस वसाहतीत आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव व किरणकुमार चव्हाण यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियान राबविले. प्रारंभी मोहिमेत सहभागी झालेल्यांना स्वच्छतेची प्रतिज्ञा देण्यात आली.

मनपातर्फे ६१ ठिकाणी स्वच्छता

स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत महानगरपालिकेच्यावतीने सर्व ३१ प्रभाग, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व शाळा अशा ६१ ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविली गेली. या मोहिमेत जमा झालेला कचरा घंटागाडीतून खत प्रकल्पात पाठविण्यात आला. सिडको विभागात आमदार सीमा हिरे, माजी नगरसेविका प्रतिभा पवार, भाजपा मंडळ अध्यक्ष अविनाश पाटील, रश्मी हिरे आदींनी सहभाग नोंदविला. मोहिमेत मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी आदी उपस्थित होते, या मोहिमेत रोटरी क्लब, पारिक सेवा संघ, रामकृष्ण मिशन, मनपा, नमामि गोदा फाउंडेशन, सत्संग फाउंडेशन यांच्यासह विविध संस्था, संघटनांच्या उपक्रमात आयएमएनेही सहभाग घेतला. सोमवारी गोदावरी स्वच्छतेची मोहीम सुरु करणार असल्याचे म्हटले आहे. आनंदवली ते रामतीर्थ या भागात १० ठिकाणी मोहीम पार पडणार आहे. तीन ऑक्टोबरला ब्रह्मगिरी परिसरात कुंड पुनर्जिवित करण्याच्या उद्देशाने उपक्रम राबविला जाणार आहे.

हेही वाचा – नाशिक : धनगर समाजाला आदिवासी आरक्षणाचा लाभ देण्यास विरोध, बोरगावात रास्ता रोको

जिल्हा रुग्णालयात स्वच्छता

जिल्हा रुग्णालय परिसरात अनेक ठिकाणी अस्वच्छतेचे दर्शन घडते. या मोहिमेच्या निमित्ताने परिसरात स्वच्छता करण्यात आली. चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेतर्फे स्वच्छता अभियान राबविले गेले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात, अतिरिक्त शल्य चिकित्सक नीलेश पाटील, डॉ. रोहन बोरसे आदींसह परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.

देवळालीत प्रतिसाद

देवळाली छावणी मंडळाच्यावतीने आठही प्रभागात श्रमदान मोहिमेत अधिकारी, कर्मचाऱ्यांसह एक हजारहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवत आपापला परिसर स्वच्छ करण्यात योगदान दिले. प्रभाग क्रमांक एकमधील आनंद रस्ता मैदानावर स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट समीर शर्मा, नामनिर्देशित सदस्या प्रितम आढाव, माजी उपाध्यक्ष बळवंत गोडसे, सचिन ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये आदींच्या उपस्थितीत मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. सावन कृपाल रूहाणी मिशन, सप्लाय डेपो, स्टेशन हेडक्वाॅर्टर, दर्शन स्कूल अकॅडमी आदी संस्थांनी सहभाग नोंदवला. भगूर शहर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

Story img Loader