नाशिक : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेत नाशिक केंद्रातून अथर्व ड्रॅमॅटिक्स अकॅडमी संस्थेच्या ‘द लास्ट व्हाईसरॉय’ नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच ओझर येथील रंगशाखा एच.ए.ई.डब्ल्यू आर.सी. संस्थेच्या ‘प्रार्थनासूक्त’ नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने देण्यात आली. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. नाटय़सेवा थिएटर्स संस्थेच्या ‘साधे आहे इतकेच’ या नाटकाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले.

सांस्कृतिक कार्यसंचालनालयाच्या वतीने १५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत परशुराम साईखेडकर नाटय़मंदिरात ५९वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेत १८ नाटय़ प्रयोग सादर करण्यात आले. यासाठी शाम अधटराव, संदीप देशपांडे, कीर्ती मानेगांवकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेत दिग्दर्शनासाठी महेश डोकफोडे (द लास्ट व्हाईसरॉय), हेमंत सराफ (प्रार्थनासूक्त), प्रकाश योजनेसाठी कृतार्थ कंसारा (द लास्ट व्हाईसरॉय), आकाश पाठक (प्रार्थनासूक्त), नेपथ्यसाठी मंगेश परमार (द लास्ट व्हाईसरॉय), गणेश सोनावणे (काठपदर), रंगभूषेसाठी माणिक कानडे (द लास्ट व्हाईसरॉय), सुरेश भोईर (ड्रीम युनिवर्स) यांना जाहीर झाले. उत्कृष्ट अभिनय रौप्यपदकाचे अक्षय मुडवदकर (द लास्ट व्हाईसरॉय) व पूनम पाटील (द लास्ट व्हाईसरॉय) यांना जाहीर झाला. अभिनयसाठी गुणवत्ता प्रमाणपत्र पूनम देशमुख (साधे आहे इतकेच), डॉ. प्राजक्ता भांबारे (भोवरा), मनीषा शिरसाठ (काठपदर), भावना कुलकर्णी (प्रेमा तुझा रंग कसा), पल्लवी ओढेकर (कहानी मे ट्वीस्ट), समाधान मुर्तडक (अरे देवा), संदेश सावंत (प्रार्थनासूक्त), विक्रम गवांदे (वारूळ), आदित्य भोम्बे

(साधे आहे इतकेच) आणि कुंतक गायधनी (अंधायुग) यांना जाहीर झालेत.