लोकसत्ता वार्ताहर

मनमाड: बिहारमधून मुलांच्या तस्करीप्रकरणी या मुलांचे पालक मनमाड रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल झाले असून त्यांचे जाब -जबाब नोंदविले जात आहेत. या मुलांना आम्ही आमच्या मर्जीने शिक्षणासाठी महाराष्ट्रात पाठवले. आमची आर्थिक परिस्थिती नसल्याने हा निर्णय घेतला. मात्र रेल्वे पोलिसांनी संबंधितावर तस्करीचा गुन्हा दाखल केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

marathwada mukti sangram din
Marathwada Liberation Day : मुक्तिसंग्रामानंतरची मराठवाड्याची मानसिक गुंतागुंत!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
sant gadgebaba sevabhavi sanstha ambajogai
सर्वकार्येषु सर्वदा: विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘आधार माणुसकीचा’!
vijay wadettiwar criticized shinde govt
“…पण सत्ताधाऱ्यांच्या मनाला पाझर फुटत नाही”; धाय मोकलून रडणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ पोस्ट करत विजय वडेट्टीवारांचं टीकास्र!
Education Opportunity Various courses run by Amrit
शिक्षणाची संधी: ‘अमृत’द्वारे चालवणारे विविध कोर्सेस
Badlapur Sexual Assault News
Badlapur Sexual Assault : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, शाळेच्या दोन विश्वस्तांबाबत एसआयटीने दिली ‘ही’ माहिती
dhule police alerted after sexual abuse case increased in country and state
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी धुळ्यातील सर्व ठाण्यांमध्ये आता पोलीस दादा, पोलीस दीदी
Anil Deshmukh, Shakti Act,
महाराष्ट्रात ‘शक्ती’ कायद्याला केंद्रामुळे विलंब? माजी गृहमंत्र्यांनी थेटच…

बहुसंख्य पालक हे सामान्य आर्थिक परिस्थितीतील व अशिक्षित असल्याचे आढळून आले. मात्र वास्तव पोलिसांच्या सर्वंकक्ष तपासणी नंतरच बाहेर येईल. दरम्यान लोहमार्ग पोलिस ठाण्यातून दोन पथके बिहार व सांगलीच्या दिशेने रवाना झाली. या तपासात मदरसा आहे का, त्याची नोंदणी आहे का, यासह विविध मुद्यांंबाबत पथक सखोल चौकशी करणार आहे. तपासासाठी वेळ कमी असल्याने शीघ्रगतीने तपास करण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेपुढे आहे. ५९ मुलांपैकी ३६ मुलांचे पालक कागदपत्रांसह येथील रेल्वे पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.

हेही वाचा… शेतकरी संवादातून काँग्रेसतर्फे मोर्चेबांधणी; चांदवडला लवकरच शेतकरी संवाद मेळावा

जळगाव येथील बालसुधारगृहातील त्यापैकी २० मुलांचे पालक (आई, वडील) कागदपत्रे घेऊन गयारी (ता. अररिया, बिहार) येथून भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात पोहोचले आहेत. मनमाड पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी पदाचा नूतन पदभार सांभाळणारे मारुती पंडित यांच्याशी संपर्क साधून त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. उर्वरित ३० मुलांना नाशिकच्या बालसुधारगृहात दाखल केले आले. त्यापैकी १६ मुलांचे पालक छत्तीस तासांचा प्रवासानंतर भुसावळमध्ये दाखल झाले. त्यानंतर १६ पालकांनी मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यात जाऊन आपला जबाब नोंदविला.