लोकसत्ता वार्ताहर
धुळे: काही वर्षांपासून बंद असलेला शिरपूर सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी केली. धुळे आणि नंदुरबार जिल्हा बँकेच्या ६६ व्या सर्वसाधारण सभेत भाडेकरारनाम्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती देण्यात आली.
अध्यक्ष कदमबांडे यांनी बँकेच्या कारभाराचा सविस्तर अहवाल सभासदांपुढे ठेवला. चालु वर्षी मार्चअखेर ९६ टक्के कर्जवसुली झाली आहे. नाबार्डनेही २०२० ते २०२२ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करून जिल्हा बँकेला ‘ब’ वर्ग दिला आहे.
हेही वाचा… धुळ्यात काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या जवाहर सूतगिरणीवर छापा
सभेचे सूत्रसंचालन व्ही. जी. पाटील यांनी केले. सभेला बँकेचे संचालक मंडळ, जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धिरज चौधरी उपस्थित होते.
शिरपूर सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर सुरू करण्याच्या घोषणेचे आपण स्वागत करतो. परंतु, कारखान्यातील यंत्रसामग्रीची अवस्था आणि द्यावे लागणारे भाडे यांची आर्थिक सांगड कशी घालता येईल, याबद्दल संबंधितांना विचार करावा लागेल. – सुभाष काकुस्ते (सरचिटणीस, साखर कामगार महासंघ