नाशिक : जिल्ह्यातून दसरा मेळाव्यांसाठी हजारो समर्थकांची रसद - दोन्ही गटांकडून जोरदार प्रयत्न | Thousands of supporters gather for Dussehra melava from the district Strong efforts from Shinde and Thackeray groups amy 95 | Loksatta

Dasara Melava 2022 : जिल्ह्यातून दसरा मेळाव्यांसाठी हजारो समर्थकांची रसद – दोन्ही गटांकडून जोरदार प्रयत्न

Dasara Melava 2022 Updates : मुंबईतील शिंदे आणि ठाकरे गटाच्या होणाऱ्या दसरा मेळाव्यास नाशिकमधून मोठी रसद पुरविण्यासाठी दोन्ही गटांनी स्थानिक पातळीवर शर्थीने प्रयत्न केले.

Dasara Melava 2022 : जिल्ह्यातून दसरा मेळाव्यांसाठी हजारो समर्थकांची रसद – दोन्ही गटांकडून जोरदार प्रयत्न
शिंदे गटाकडून नाशिकहून मुंबईतील मेळाव्यासाठी जाणारी बस

Dasara Melava 2022 Latest News: मुंबईतील शिंदे आणि ठाकरे गटाच्या होणाऱ्या दसरा मेळाव्यास नाशिकमधून मोठी रसद पुरविण्यासाठी दोन्ही गटांनी स्थानिक पातळीवर शर्थीने प्रयत्न केले. त्यामुळे नाशिक-मुंबई महामार्ग भगवे झेंडे लावत गटा-तटाचे प्रदर्शन करणाऱ्या वाहनांनी भरून गेला. यात शिंदे गटाच्या वाहनांची संख्या अधिक होती. पण त्यातील अनेक वाहने क्षमतेच्या निम्म्या प्रमाणात रिक्तच होती. त्यातही समर्थकांमध्ये ज्येष्ठांचा अधिक्याने भरणा होता. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे, आ. सुहास कांदे यांनी गर्दी जमविण्यासाठी नियोजनात कुठलीच कसर सोडली नाही. सत्ता नसताना ठाकरे गटाने संबंधितांना चांगलाच प्रतिशह देण्याची धडपड केली. या गटाच्या महिला सदस्याही प्रथमच मोठ्या संख्येने दसरा मेळाव्यात सहभागी झाल्या. ठाकरे गटाची वाहने कमी होती. पण जी वाहने मुंबईला मार्गस्थ झाली, त्यात समर्थक ठळकपणे दिसत होते. दोन्ही गटांनी हजारो समर्थकांना मुंबईत नेल्याचे दावे-प्रतिदावे केले आहेत. महामार्गावर दोन्ही गटांमध्ये घोषणाबाजीचे युध्द रंगले.

हेही वाचा >>>Dasara Melava 2022: विचित्र हातवारे करणाऱ्या शिंदे गटातील समर्थकांना ठाकरे गटातील महिलांचा चोप

शिवसेनेत फूट पडल्यानंतर दसरा मेळाव्यासाठी स्थानिक पातळीवर दोन्ही गटांची चांगलीच कंबर कसली होती. शिंदे गटाने जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून ३३७ बस आणि ४२४ जीप, टेम्पो आदी वाहनांद्वारे समर्थकांना मुंबईत नेण्याचे नियोजन केले. नाशिकसह आसपासच्या जिल्ह्यातून मुंबईला जाणाऱ्या समर्थकांना भोजन, पाणी व अन्य सर्व व्यवस्था केली. त्याचा खुद्द पालकमंत्री भुसे यांनी रात्री फिरून आढावा घेतला. बुधवारी सकाळी भुसे यांनी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. राज्यासह समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण ही शिकवण आहे. त्याची प्रभावी अमलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करीत आहे. त्यांच्या माध्यमातून विचारांचे सोने लुटण्यासाठी नाशिकमधील तमाम शिवसैनिक मोठ्या संख्येने वाजतगाजत मुंबईला मार्गस्थ होत असल्याचे भुसे यांनी सांगितले. महामार्गावर वाहतूक सुरळीत राहील, कुठलेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेण्यात आल्याचे ते म्हणाले. शिंदे गटाने आगाऊ नोंदणी केल्यामुळे त्यांच्याकडे बस, वाहनांची कमतरता नव्हती. वेगवेगळ्या भागातून त्यांची वाहने महामार्गावरून मार्गस्थ झाली. ग्रामीण भागातील काही वाहने शहराच्या वेशीवर पाथर्डी येथे काही काळ विसावत होती. अनेक वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा निम्म्या प्रमाणात प्रवासी नव्हते. या संदर्भात महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी संपूर्ण रस्ता शिंदे गटाच्या वाहनांनी व्यापल्याकडे लक्ष वेधले. शहरातून ४४ बसगाड्या, नऊ टेम्पो ट्रॅव्हलर, ९६ चारचाकी वाहने पूर्ण क्षमतेने भरून गेल्या आहेत. ग्रामीण भागातील वाहनांमध्ये कमी प्रवासी असू शकतात, अशी शक्यता त्यांनी वर्तविली.
मुंबईतील मेळाव्यात गर्दी जमविण्यात ठाकरे गट मागे राहिला नाही. नाशिकमधून २०० बसगाड्या आणि ६०० चारचाकी वाहनांद्वारे १५ ते १७ हजार शिवसैनिक मुंबईला गेल्याचा दावा महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला. इगतपुरी, मनमाड आणि नाशिकरोड येथील शिवसैनिक रेल्वेने मार्गस्थ झाल्याचे त्यांनी सांगितले. सेनेतील फाटाफूटीचा परिणाम संघटनात्मक पातळीवर झालेला नाही. त्यामुळे मेळाव्यात रसद पुरवण्यात या गटाला फारशी कसरत करावी लागली नाही. उलट महिला आघाडीच्या सदस्या यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणात मेळाव्यात सहभागी झाल्या. शिंदे गटाच्या तुलनेत या गटाची वाहने कमी होती. दोन्ही गटांच्या समर्थकांनी वाहनांवर भगवे झेंडे लावलेले होते. वाहनावरील स्टिकरवरून गटाची ओळख होत होती.

हेही वाचा >>>जळगाव : दाम्पत्याची भोंदूबाबाकडून साडेअकरा लाखांना फसवणूक

भोजनाची व्यवस्था आणि वाहतूक कोंडी

शिंदे गटाने कार्यकर्त्यांची बरीच काळजी घेतल्याचे दिसले. नाशिक जिल्हयातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना इगतपुरी येथील के.पी.जी. महाविद्यालयात पिण्याच्या पाण्यासह जेवणाची सुविधा करण्यात आली. विशेष म्हणजे इगतपुरी येथे सकाळी ११ वाजेपासूनच पालकमंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे व संपर्क प्रमुख जयंत साठे यांच्यासह आ. सुहास कांदे, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ तळ ठोकून होते. सकाळी दहा वाजेपर्यंत शांतता होती. मात्र अकरानंतर बस व चारचाकी वाहनांची गर्दी उसळली. यावेळी महामार्गावर शिंदे गटाच्या वाहनांची कुमक मोठया प्रमाणात दिसत होती. ठाकरे गटाच्या वाहनांचे प्रमाण कमी होते. दुपारी एक वाजेच्या दरम्यान घोटी खिंड ते केपीजी महाविद्यालयापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एक ते दीड तास वाहतूक कोंडी झाली. उत्तर महाराष्ट्रातून सर्वाधिक हजारो वाहने घोटी टोल नाक्यावरून मुंबईला गेल्याची माहिती प्रशासनाने दिली.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
दसऱ्यानिमित्त जळगावात ५० किलोहून अधिक सोने विक्री – कोट्यवधींची उलाढाल

संबंधित बातम्या

VIDEO: “अनेक मुलींचे खून हिंदू मुलांकडूनही झालेत आणि…”, ‘लव्ह जिहाद’वर बोलताना संजय राऊतांचं मोठं विधान
मालेगाव: शालेय पोषण आहाराचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक
धुळे पोलिसांकडून बनावट दारुचा अड्डा उद्ध्वस्त; ९५ लाखांपेक्षा अधिकचा ऐवज हस्तगत
कांदा उत्पादकांच्या अनुदानात वाढ करावी- सुनील तटकरे
उद्योग विस्तारात वाढीव घरपट्टीचा अवरोध; ‘आयमा’चे पालिका आयुक्तांना साकडे

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“महिलांनाही एकापेक्षा जास्त पती असण्याचा हक्क…” जावेद अख्तर यांचं ‘मुस्लीम पर्सनल लॉ’बाबत वक्तव्य
पाच तासांत फडणवीस-शिंदेंचा ५३० किमी प्रवास; ‘समृद्धी महामार्गा’वर स्पीड लिमिट किती? सर्वसामान्यांना या वेगाने जाता येणार?
Abu Dhabi T10 League 2022: डेक्कन ग्लॅडिएटर्सने न्यूयॉर्क स्ट्रायकर्सवर मात करून दुसऱ्यांदा पटकावले विजेतेपद
Viral Video: गोविंदाच्या ‘दुल्हे राजा’वर या मेंढपाळाचा भन्नाट डान्स; स्टेप्स पाहून नेटकरीही झाले फिदा
Video : राखी सावंत-आरोह वेलणकरमध्ये खडाजंगी, म्हणाला “तुझ्या बापाचं…”