नाशिक : पावसामुळे घाट परिसरात दरड कोसळण्याचे प्रकार नित्याचे आहेत. त्र्यंबके श्वर येथील ब्रह्मगिरी परिसरात सात दिवसाच्या आत दोनवेळा दगड घसरण्याचे प्रकार घडले आहेत. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास काही दगड घसरल्याने संरक्षक साहित्य घरंगळत खाली आहे. यामुळे तीन पर्यटकांना किरकोळ दुखापत झाली.

ब्रह्मगिरी परिसरातील उत्खननाविरोधात शहर परिसरातील पर्यावरण प्रेमी संघटनांनी एकत्र येत ब्रह्मगिरी बचाव कृती समितीच्या माध्यमातून आवाज उठविला आहे. येथील अनेक धोकादायक भागाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येत आहे. मागील आठवडय़ात ब्रह्मगिरीजवळील दुर्ग भांडार

येथील बाल गंगाद्वाराजवळून दरड कोसळली होती. सुदैवाने या अपघातात कु ठलीच जीवितहानी झाली नाही. मात्र या प्रकाराने नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. सोमवारी दुपारी चार वाजता ब्रह्मगिरी येथील ब्रह्मा गुहेजवळील वरच्या भागावरून काही दगड घरंगळत आले. त्यामुळे तेथील लोखंडी कथडेही तुटले. ब्रह्मगिरी चढणाऱ्या तीन पर्यटकांना या अपघातात दुखापत झाली. या प्रकाराने काही काळ भाविकांमध्ये गोंधळ निर्माण झाला.

घटनेची माहिती मिळताच शासकीय यंत्रणेचीही धावपळ उडाली. घटनास्थळी दाखल होत दगडांमुळ ेझालेले नुकसान, तुटलेले संरक्षण साहित्य बाजूला करत जखमी झालेल्या पर्यटकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळांवर बंदी असतांनाही नागरिकांकडून खुले आम नियमांचे उल्लंघन होत असून प्रशासन मात्र सुस्त आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मागणी होत आहे.

ब्रह्मगिरी पर्वतावर अशी कु ठलीही हानी झालेली नाही. आमच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जावून पाहणी के ली. कोणताही अपघात झालेला नाही

– दीपक गिरासे (तहसीलदार, त्र्यंबके श्वर)