नांदगाव- जालना येथून लग्न सोहळा आटोपून मालेगावकडे परतत असतांना नाशिकच्या नांदगाव – मालेगाव रस्त्यावरील नाग्या – साक्या धरणासमोरील कठडे नसलेल्या पुलावरून ‘ इको कार ‘ नदीत कोसळल्याने चार वर्षीय बालिकेसह तिघांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले. अपघात मंगळवारी पहाटे झाला. अपघाताची माहिती कळताच पोलीस व स्थानिक नागरिक यांनी तातडीने मदत कार्य करत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे नांदगाव येथील ग्रामीण दाखल केले. रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्याने प्रथमोपचार करत रुग्णांना मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
हेही वाचा >>> जळगाव: ऑनलाइन व्यापाराच्या नावाखाली फसविणार्यास भावनगरातून अटक; पाच लाखांची रोकड हस्तगत
अपघातातील मयतांची नावे-
डॉ.याकूब मन्सूरी रमजान ( ४४),
अफरोज अब्दुल लतिफ मन्सूरी (३७),
शिफा वसीम मन्सूरी (४)
जखमींमध्ये
नजमा याकूब मन्सूरी (४५),
आयान याकूब मन्सूरी (२५),
अबुजर याकूब मन्सूरी (२५)
सारा वसीम मन्सूरी (3)
सुमैय्या वसीम मन्सूरी,
वसीम अब्दुल लतिफ मन्सूरी ( 35),
मिस्बाह याकूब मन्सूरी (30) यांचा समावेश आहे