Premium

नाग्या-साक्या पुलावरून कार कोसळली; बालिकेसह तीघांचा मृत्यू ; सात जण गंभीर

अपघाताची माहिती कळताच पोलीस व स्थानिक नागरिक यांनी तातडीने मदत कार्य करत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे नांदगाव येथील ग्रामीण  दाखल केले.

nashik road accidents death
नाग्या-साक्या पुलावरून कार कोसळली; छायाचित्र : लोकसत्ता टीम

नांदगाव- जालना येथून लग्न सोहळा आटोपून मालेगावकडे परतत असतांना नाशिकच्या नांदगाव – मालेगाव रस्त्यावरील नाग्या – साक्या धरणासमोरील कठडे नसलेल्या पुलावरून ‘ इको कार ‘ नदीत कोसळल्याने चार वर्षीय बालिकेसह तिघांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले. अपघात मंगळवारी पहाटे झाला. अपघाताची माहिती कळताच पोलीस व स्थानिक नागरिक यांनी तातडीने मदत कार्य करत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे नांदगाव येथील ग्रामीण  दाखल केले. रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्याने प्रथमोपचार करत रुग्णांना मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> जळगाव: ऑनलाइन व्यापाराच्या नावाखाली फसविणार्‍यास भावनगरातून अटक; पाच लाखांची रोकड हस्तगत

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three including a four year old girl died on the spot after the eco car fell into the river zws

First published on: 30-05-2023 at 12:39 IST
Next Story
जळगाव: ऑनलाइन व्यापाराच्या नावाखाली फसविणार्‍यास भावनगरातून अटक; पाच लाखांची रोकड हस्तगत