नाशिक – बंधाऱ्यात मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या मुलाला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागल्याने बाजूलाच उभ्या असलेल्या त्याच्या आईने धाव घेतली. बाजूलाच मेंढ्या चारत असलेला महिलेचा भाऊही पाण्यात उतरला. परंतु, त्याला पोहता येत नसल्याने त्याचे प्रयत्न व्यर्थ गेले. मायलेकासह तिघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथे घडली.

नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथे अंबादास खरात (२९, दहेगाव, नांदगाव), इंदुबाई विटणर (३५, खिर्डी, नांदगाव) आणि वाल्मिक विटणर (१५, खिर्डी,नांदगाव) हे तिघे बाणगंगा नदीच्या कडेला मेंढ्या चारत होते. मुलगा वाल्मिक हा एका मेंढीला धुण्यासाठी बंधाऱ्यात घेऊन गेला. अंदाज न आल्याने तो पाण्यात पडून बुडू लागला. हे पाहून त्याची आई इंदुबाई यांनी मुलाला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र त्याही बुडू लागल्या. हे दृश्य पाहून वाल्मिकच्या मामीने जोरजोरात आरडाओरड सुरू केली. बाजूलाच मेंढ्या चारत असलेला वाल्मिकचा मामा अंबादास थोरात याने पाण्यात उडी घेत दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यालाही पोहता येत नसल्याने तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने तीनही मृतदेह बाहेर काढण्यात आले. नांदगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

woman cheated grape growers, grape growers,
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या महिलेस दिल्लीत अटक
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
Dhule district fake death case to collect insurance money
विम्याचे पैसे मिळावेत म्हणून अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव
Insurgency in declared seats led parties to deny chances to insurgents keeping seat allocation secret
बंडखोरी टाळण्यासाठी पक्षांकडून कालापव्यय, जिल्ह्यातील अनेक जागांवर घोळ कायम
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Fraud with businessman, fake police officer, Nashik,
बनावट पोलीस अधिकाऱ्याकडून व्यावसायिकाची फसवणूक
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”

हेही वाचा – बंडखोरी टाळण्यासाठी पक्षांकडून कालापव्यय, जिल्ह्यातील अनेक जागांवर घोळ कायम

बंधाऱ्यात मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या मुलाला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागल्याने बाजूलाच उभ्या असलेल्या त्याच्या आईने धाव घेतली. बाजूलाच मेंढ्या चारत असलेला महिलेचा भाऊही पाण्यात उतरला. परंतु, त्याला पोहता येत नसल्याने त्याचे प्रयत्न व्यर्थ गेले. मायलेकासह तिघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथे घडली.

हेही वाचा – काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सांगली प्रारुपसाठी आग्रह, पक्ष निरीक्षकांकडून सबुरीचा सल्ला

नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथे अंबादास खरात (२९, दहेगाव, नांदगाव), इंदुबाई विटणर (३५, खिर्डी, नांदगाव) आणि वाल्मिक विटणर (१५, खिर्डी,नांदगाव) हे तिघे बाणगंगा नदीच्या कडेला मेंढ्या चारत होते. मुलगा वाल्मिक हा एका मेंढीला धुण्यासाठी बंधाऱ्यात घेऊन गेला. अंदाज न आल्याने तो पाण्यात पडून बुडू लागला. हे पाहून त्याची आई इंदुबाई यांनी मुलाला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र त्याही बुडू लागल्या. हे दृश्य पाहून वाल्मिकच्या मामीने जोरजोरात आरडाओरड सुरू केली. बाजूलाच मेंढ्या चारत असलेला वाल्मिकचा मामा अंबादास थोरात याने पाण्यात उडी घेत दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यालाही पोहता येत नसल्याने तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने तीनही मृतदेह बाहेर काढण्यात आले. नांदगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Story img Loader